Ind vs Pak Women's Asia Cup 2026 : महामुकाबल्याचा काऊंटडाऊन! महिला आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार; सामना कधी, कुठे आणि कसा पाहाल? वाचा सविस्तर

दुबई : महिला आशिया कप २०२६ स्पर्धेत आधीच उपांत्य फेरीत धडक मारल्यानंतर भारतीय महिला संघ आता आपल्या साखळी फेरीतील अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात भारताची गाठ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी पडणार आहे. शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी रंगणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. चालू स्पर्धेतील सलग विजय आणि तगडी गोलंदाजी-फलंदाजी पाहता भारतीय संघ या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानसमोर भारताला रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.




स्मृती-शेफालीचा धडाका अन् भारताची तगडी फलंदाजी


भारतीय संघाची सर्वात मोठी ताकद ठरतेय ती म्हणजे सलामीवीर स्मृती मानधना (Smruti Mandhana) आणि शेफाली वर्मा (Shefali Varma) यांचा तुफानी फॉर्म. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात मानधनाने केलेल्या विक्रमी शतकाने प्रतिस्पर्धी संघांच्या गोटात धडकी भरवली आहे. या सलामीच्या जोडीकडून पुन्हा एकदा आक्रमक सुरुवातीची अपेक्षा असेल. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौर, रिचा घोष आणि प्रतिका रावल यांच्यावर मधल्या फळीत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याची किंवा मिळालेल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्याची जबाबदारी असेल.



पाकिस्तानच्या फलंदाजीची डोकेदुखी; भारतासमोर कसोटी


दुसऱ्या बाजूला पाकिस्तान संघाची फलंदाजी ही त्यांची सर्वात कमजोर कडी ठरत आहे. थायलंडविरुद्धच्या सामन्यात पॉवरप्लेमध्येच ३ विकेट्स गमावल्यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली होती. तो सामना त्यांनी ११९ धावांचा बचाव करत जिंकला असला, तरी भारताच्या भक्कम गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांची खरी कसोटी लागणार आहे. पाकिस्तानला विजयाची आशा जिवंत ठेवायची असेल तर त्यांच्या फलंदाजांना अत्यंत शिस्तबद्ध आणि आक्रमक खेळ करावा लागेल.



भारत वि. पाकिस्तान सामन्याची A टू Z माहिती




  • सामन्याची तारीख व वेळ: हा थरारक सामना शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरू होईल.




  • सामन्याचे ठिकाण: हा सामना दुबईतील प्रसिद्ध 'दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम'वर खेळवला जाणार आहे.




  • टीव्हीवर थेट प्रक्षेपण: टीव्हीवर या सामन्याचा थेट आनंद घेण्यासाठी चाहत्यांना 'सोनी स्पोर्ट्स नेटवर्क'च्या (Sony Sports Network) विविध वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल.




  • मोबाईलवर LIVE स्ट्रीमिंग: डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना पाहणाऱ्या चाहत्यांसाठी 'SonyLIV' ॲप आणि त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असणार आहे.



Comments
Add Comment

रील बनवण्याच्या नादात चिमुकलीचा जीव धोक्यात? समुद्राच्या लाटांमधून अनोळखी व्यक्तीने वाचवलं; व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात आपण किती निष्काळजी होऊ शकतो, याची जाणीव करून देणारा एक व्हिडिओ सध्या

Vijayadashami 2026: दसऱ्याचा सण, विजयाचा संकल्प; राष्ट्रपती आणि पंतप्रधान काय म्हणाले?

नवी दिल्ली: आज देशभरात विजयादशमीचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. या मंगल प्रसंगी राष्ट्रपती

लखनऊ-प्रयागराज महामार्गावर भीषण अपघात, ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जाणाऱ्या पिकअपची डिव्हायडरला धडक, दोघांचा मृत्यू

लखनऊ–प्रयागराज राष्ट्रीय महामार्गावरील दखिना टोल प्लाझाजवळ तीन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताचे

दसऱ्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात घसरण, एक ग्रामसाठी किती मोजावे लागणार?

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी सोनं खरेदीसाठी बाजारात लगबग असते. पण गेल्या

दिल्ली मेट्रो स्थानकात खळबळ : १५५ ग्रॅम सोन्याची पावडर लपवून पळणाऱ्या प्रवाशाला CISFने घेतले ताब्यात

नवी दिल्ली : दिल्लीतील जामा मशिद मेट्रो स्थानकावर (Delhi Metro Station) १७ ऑक्टोबर रोजी एक थरारक घटना घडली. सामानाची तपासणी

Airtel Recharge: एअरटेलचे डेटा नसलेले तीन नवे ‘व्हॉइस आणि एसएमएस’ प्लॅन सादर; जिओशी असणार स्पर्धा

मुंबई: मोबाईलवर इंटरनेटचा वापर न करता केवळ कॉलिंग आणि मेसेजसाठी फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एअरटेलने तीन नवे