वाडा : वार्ताहर
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वाडा येथे लिओ क्लब ऑफ विवेकानंद वाडाची स्थापना करण्यात आली. लायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट ३२३१-ए२ (झेड-४) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्थापना व पदग्रहण समारंभात नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
Nashik : विसापूर आश्रमशाळेतील ८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, पालकांकडून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आरोप
Nashik : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातुन खळबळजनक घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील विसापूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत (Government Secondary Ashram School) इयत्ता ...
या कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लिओ लायन इशिका शाह, लिओ डिस्ट्रिक्ट ऍडव्हायझर अक्षय लडगे, तसेच विशेष अतिथी म्हणून लिओ ध्रुवी वरचंद (GAT Director), उपस्थित होते. नवीन कार्यकारिणीत सिद्धांत विभव पाटील यांची अध्यक्षपदी, कामिनी संतोष नलावडे यांची उपाध्यक्षपदी, वेदिका विलास धिडा यांची सचिवपदी तर हिमांशू दिनेश निशाद यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन नेतृत्वगुण विकसित करण्याचे आवाहन करण्यात आले. नव्याने स्थापन झालेल्या लिओ क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. स्थापना व पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





