Eknath Shinde : जोगेश्वरी एसआरए प्रकरणी मोठी कारवाई; संबंधित दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे निर्देश

मुंबई : जोगेश्वरी, गोरेगाव या भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) सदनिका वाटपात पात्र लाभार्थ्यांना डावलून घरे दिल्याच्या तक्रारींची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश एसआरए प्राधिकरणाला दिले. (Eknath Shinde)


त्याचबरोबर ओशिवरा व्हीलेज येथील प्रकल्पात अपात्र लोकांना घरे वाटप केल्याप्रकरणी दोषी संबंधित एसआरएचे सक्षम प्राधिकारी, सहायक निबंधक या दोघा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी आज येथे दिले. कायमस्वरूपी संक्रमण शिबीर (पीटीसी) इमारती विकासकाने एसआरएकडे हस्तांतरीत न केल्याच्या प्रकरणाची देखील चौकशी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.


उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित नागरी प्रश्न, पुनर्विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी खासदार रविंद्र वायकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, एसआरएचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र कल्याणकर, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बोरीकर, मुंबई महापालिकेचे मुख्य अभियंता, सहायक आयुक्त आदी या बैठकीत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. (Eknath Shinde)



यावेळी खासदार वायकर यांनी आपल्या मतदारसंघातील भगतसिंग नगर १,२,३, दुर्गानगर, कोयना वसाहत, मेघवाडी, सर्वोदय सोसायटी, ओशीवरा व्हीलेज येथील एसआरए प्रकल्पांबाबत तक्रारीं केल्या. पात्र लाभार्थ्यांना सदनिका वाटप न करता बोगस व्यक्तींना त्यांचे वाटप करणे या तक्रारीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबन करण्यात यावे, असे निर्देश प्राधिकरणाला दिले. तसेच ज्या एसआरए प्रकल्पातील घरांचे वाटप झाले आहे परंतु त्याबाबत तक्रारी आहेत त्या सर्वांचा आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. (Eknath Shinde)


याभागातील कायमस्वरूपी संक्रमण शिबिराच्या (पीटीसी) दोन इमारती विकासकांनी प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे अपेक्षित असताना त्यांची परस्पर विक्री केल्याबाबत बैठकीत निर्दशनास आणून देण्यात आले. याप्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीचे निर्देश दिले. (Eknath Shinde)



मेट्रो मार्गिका क्रमांक दोन ब येथील पूर्व पश्चिम स्थानकास जोडणाऱ्या स्थानकाला 'हरे रामा हरे कृष्णा' असे नामकरणाच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्र्यांनी आज कृष्णजन्माष्टीच्या दिवशी मंजुरी देत असल्याचे सांगितले. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जोगेश्वरी गुंफांचा पर्यटन विभागामार्फत सर्वांगीण विकास केला जावा, यासाठी लागणारा आवश्यक निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. (Eknath Shinde)


एसआरएच्या ज्या न्यायप्रविष्ट बाबी प्रलंबित त्यासाठी न्यायालयासमोर भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी सक्षम कायदेतज्ञांची टीम तयार करावी असेही त्यांनी सांगितले. फोर्स वन च्या मुख्यालयासाठी जागेची मागणी असून त्या जागेचा सातबारा वेगळा करण्यासाठी म्हाडाने मदत करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. आरे कॉलनीतील आप्पा पाडा येथील नागरिकांना मुलभूत नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबई महापालिका, वन विभाग आणि आदिवासी विकास आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी याभागाला भेट देऊन नागरिकांना सुविधा मिळणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी सर्वोदयनगर येथील मेट्रो ६ च्या प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या रहिवाशांना सदनिका वाटप करण्यात येणार असून त्यातील सहा जणांना आज प्रातिनिधीक स्वरूपात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आले.

Comments
Add Comment

School Bag Policy 2020 : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार! ‘स्कूल बॅग पॉलिसी २०२०’ची काटेकोर अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ व

Mumbai Local Train : रेल्वे प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवारी कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Prakash Abitkar : 'अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबवा'

मुंबई : महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार

CM Devendra Fadnavis : 'भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या यशात महाराष्ट्र प्रमुख भागीदार ठरणार'

मुंबई : भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा केवळ शुल्क, नियम आणि बाजारपेठेतील प्रवेशापुरता मर्यादित नसून

BARTI : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित

Mohan Bhagwat Britain Visit : सरसंघचालकांच्या ब्रिटन दौऱ्यात ‘लोकसंवादा’वर भर

लंडन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 2 ते 7 सप्टेंबरदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. संघाचे