मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात 'पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र'चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी मुंबईतील १० वेगवेगळ्या प्रमुख केंद्रांवर हे भव्य रोजगार मेळावे पार पडणार आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली असून, अधिकाधिक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.
Nashik : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik Agricultural Produce Market Committee) अडचणी आता चांगल्याच वाढल्या आहेत. जमीन संपादनाच्या वाढीव मोबदल्यापोटी तब्बल ३६ कोटी ५२ लाख ...
बेरोजगार युवकांसाठी आयोजित या महामेळाव्याची व्याप्ती मोठी असून, विविध क्षेत्रांनुसार १० केंद्रांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सेंट झेविअर्स टेक्निकल इन्स्टिट्यूट (माहिम), अंजुमन-इ-इस्लाम (भायखळा), सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स (फोर्ट), श्रीमती मणीबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालय (माटुंगा), जय हिंद कॉलेज (फोर्ट), गुरु नानक खालसा महाविद्यालय (माटुंगा), अंजुमन-इ-इस्लाम इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट (फोर्ट), ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज (फोर्ट), बॉम्बे टेक्निकल स्कूल ऑफ इंजिनिअरिंग (गिरगाव) आणि एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर (फोर्ट) या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. या केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बँकिंग, फायनान्स, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक्स आणि एमएसएमई यांसारख्या विविध क्षेत्रांतील कंपन्या सहभागी होणार आहेत.
मुंबई : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पावन तपोभूमी असलेल्या देहूजवळील भंडारा आणि भामचंद्र गडाच्या सद्यस्थितीचा सर्वंकष अभ्यास करून येत्या एका ...
इयत्ता १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा तसेच इतर व्यावसायिक कौशल्ये असणारे सर्व पात्र उमेदवार या मेळाव्यात सहभागी होण्यास पात्र आहेत. उमेदवारांना नोकरीपूर्व प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यासाठी पूर्व-नोंदणी करणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार असून, याद्वारे मुलाखतीची तयारी, संवाद कौशल्य व सॉफ्ट स्किल्सचे मार्गदर्शन केले जाईल. तसेच, मुंबई परिसरातील खासगी कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्थांनी आपल्याकडील रिक्त पदांची माहिती निर्धारित लिंकवर नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.