Bhandara gad news : भंडारा-भामचंद्र गडाच्या सद्यस्थितीचा महिनाभरात अहवाल सादर करा; सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पावन तपोभूमी असलेल्या देहूजवळील भंडारा आणि भामचंद्र गडाच्या सद्यस्थितीचा सर्वंकष अभ्यास करून येत्या एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिले आहेत. भंडारा व भामचंद्र डोंगर परिसर तात्काळ 'संरक्षित क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात यावा, तसेच या ऐतिहासिक व आध्यात्मिक परिसरात सातत्याने होणारे अवैध उत्खनन आणि अनधिकृत बांधकामे कायमस्वरूपी थांबवण्यात यावीत, अशी ठाम मागणी तपोभूमी संरक्षक संघर्ष समितीने केली होती. यासाठी शासनाने २०११ मध्ये तयार केलेली राज्य संरक्षित स्मारकाची अधिसूचना तातडीने लागू करण्याची विनंतीही समितीने सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली एका महत्त्वपूर्ण संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.



सर्व संबंधित विभागांना समन्वयाचे आदेश


भंडारा-भामचंद्र गडाच्या संपूर्ण परिसराशी राज्य शासनाच्या विविध विभागांचा थेट संबंध येतो. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये योग्य समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब विचारात घेऊन मंत्री ॲड. शेलार यांनी मुख्य सचिवांना सूचना देऊन, सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून परिसराच्या सद्यस्थितीचा सविस्तर अभ्यास करण्याचे आणि एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या संपूर्ण कार्यवाहीसाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी सर्व विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.



अधिसूचना आणि उत्खननाची सद्यस्थिती


बैठकीदरम्यान पुरातत्त्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये राज्य संरक्षित स्मारकाबाबत अधिसूचनेचा मसुदा तयार करण्यात आला होता. २०१७ मध्ये विधी व न्याय विभागाने काही बदल सुचवून तो प्रस्ताव परत पाठवला होता. त्यानुसार पुरातत्त्व विभागाने २०२५ मध्ये सर्व आवश्यक सुधारणा करून नवीन सुधारित प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पुन्हा सादर केला आहे. दुसरीकडे, या डोंगर परिसरात होणाऱ्या उत्खननाबाबत जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीच्या (MIDC) अधिकाऱ्यांनीही आपली बाजू मांडली. या अवैध उत्खननाची पाहणी आणि तपासणी करण्यासाठी एक संयुक्त समिती गठीत करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.



वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती


या बैठकीस तपोभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील महाराज यांच्यासह समितीचे प्रतिनिधी, संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन, एमआयडीसी तसेच विविध संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

Rojgar Mahakumbh : मुंबईत २९ सप्टेंबरला रोजगाराचा 'महाकुंभ'; पंडित दीनदयाळ उपाध्याय 'रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र' अंतर्गत शहरात १० ठिकाणी भव्य मेळावे

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई

Adivasi Vikas Vibhag : शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, शिक्षण आयुक्तालयाकडून १ हजार ६०० उमेदवारांची यादी प्राप्त; आदिवासी विकास विभागाकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर

मुंबई : आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित)

Eknath Shinde : रिक्षा-टॅक्सी चालकांच्या कष्टाला सन्मानाची जोड, आनंद दिघे यांच्या नावाने उभे राहिलेले महामंडळ देशासाठी आदर्श; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : दिवसभर अथक परिश्रम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार

BMC Corporators Tablet : नगरसेवकांच्या हाती टॅब पडण्यापूर्वी खरेदीची फाईल बंद; ऍपलच्या टॅबवरील खर्चाचा आकडा पाहून प्रशासनाने घेतला आखडता हात?

मुंबई (सचिन धानजी) : मुंबइ महापालिकेतील कारभार पेपरलेस करण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने नगरसेवकांना टॅब

Heartwarming display of friendship : महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यात मैत्रीचा गोडवा; एकमेकांना भरवली जिलेबी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून मुंबईतील महापालिकेतील भाजपच्या नेत्यांमध्ये वाद निर्माण करून

BMC News : बांधकामाचा अनधिकृत राडोराडा प्रकरणांत पाच महिन्यांत ३१.६४लाखांचा दंड वसूल; स्वच्छतेच्या नवीन उपविधीनुसार ५२५६ लोकांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत बांधकाम व पाडकाम कचऱ्याच्या अनधिकृत विल्हेवाटीमुळे रस्त्यांवरील धूळ,