Friday, September 4, 2026

Agripada Crime News : मुंबई हादरली! अग्रिपाड्यात पत्नीची हत्या करून पतीनेही उचललं टोकाचं पाऊल

Agripada Crime News : मुंबई हादरली! अग्रिपाड्यात पत्नीची हत्या करून पतीनेही उचललं टोकाचं पाऊल

मुंबई : मुंबईच्या अग्रिपाडा परिसरात पतीने पत्नीची हत्या करून त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. (Agripada Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद एहसान शेख (१९) याने पत्नी जन्नत एहसान शेख हिच्यावर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकू फिरवून आत्महत्येचा प्रयत्न केला. शुक्रवारी पहाटे सुमारे ५ वाजता कालापानी चौकीजवळ ही घटना घडली. (Agripada Crime News)

घटनेत गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद एहसानला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जन्नत हिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. मोहम्मद एहसान आणि जन्नत हे दोघेही रोजंदारीवर काम करत होते. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, तरुणाच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Agripada Crime News)

प्राथमिक तपासात घरगुती वादातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या हत्याकांडामागे नेमके काय कारण होते, याचा तपास सध्या अग्रिपाडा पोलिसांकडून सुरू आहे. (Agripada Crime News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >