A second life : अंधार, चिखल अन् 'हरे कृष्ण'चा जप! बोगद्यात १० दिवस मृत्यूशी झुंज; नेपाळमधील 'त्या' इंजिनियर्सचा चमत्कारिक पुनर्जन्म

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरानंतर एक थक्क करणारा चमत्कार समोर आला आहे. त्रिशुली-३ ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात गेल्या १० दिवसांपासून अडकलेल्या दोन कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात सैन्याला यश आले आहे. सर्व आशा संपल्याचे वाटत असतानाच मेकॅनिकल इंजिनियर संजय साह आणि कबीर महाजन या दोघांना मृत्यूच्या मुखातून बाहेर काढण्यात आले. अंधार आणि चिखलाने भरलेल्या या बोगद्यात १० दिवस अडकून पडले असताना केवळ 'हरे कृष्ण महामंत्राचा' जप करत स्वतःची जिद्द आणि जगण्याची आशा कायम ठेवल्याचे संजय साह यांनी सांगितले.



१२५० हून अधिक बळी; ९०० कामगार अजूनही अडकल्याची भीती


नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात झालेल्या ढगफुटीमुळे त्रिशुली नदीला भयानक महापूर आला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १२५० हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्रिशुली नदीच्या काठावर असलेल्या सुमारे १२ जलविद्युत प्रकल्पांना या पुराचा मोठा फटका बसला असून, अजूनही ९०० हून अधिक कामगार विविध बोगद्यांमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लष्कर आणि बचाव पथकांकडून रात्रंदिवस शोधमोहीम सुरू असून, संजय आणि कबीर हे जीवित बाहेर आलेले पहिले सुदैवी ठरले आहेत.



लष्कराचे अथक प्रयत्न अन् सुटकेचा नाट्यमय क्षण


नेपाळ सैन्याने चिखल आणि ढिगारा बाजूला करत या दोघांना जेव्हा बाहेर काढले, तो क्षण अत्यंत भावूक होता. अंगावर चिखलाचे थर साचलेले असताना जेव्हा संजय साह बोगद्याबाहेर आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जिवंत राहिल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. बचाव पथकातील सैनिकांनीही संजय यांना पाहून "हा तुमचा दुसरा जन्मच आहे," अशा भावना व्यक्त केल्या.



इतरांचा जीव वाचवण्यासाठी स्वतः प्राणांच्या दावणीला


नेपाळच्या सप्तरी जिल्ह्यात राहणारे संजय साह हे या जलविद्युत प्रकल्पाच्या नियंत्रण कक्षाचे (कंट्रोल रूम) प्रमुख म्हणून कार्यरत होते. पुराचे पाणी आणि चिखल जेव्हा वेगाने बोगद्यात शिरू लागला, तेव्हा तिथे ४० ते ४५ कामगार काम करत होते. एक जबाबदार वरिष्ठ अधिकारी म्हणून संजय यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्व सहकाऱ्यांना तातडीने सुरक्षित बाहेर पडण्याचे निर्देश दिले. इतरांचे प्राण वाचवण्याच्या या धावपळीत सगळे कामगार बाहेर पडले, मात्र दुर्दैवाने संजय साह आणि कबीर महाजन बोगद्यातच अडकून पडले. "कंट्रोल रूमचा प्रमुख या नात्याने प्रत्येकाला सुरक्षित बाहेर काढणे हे माझे पहिले कर्तव्य होते," असे संजय यांनी अत्यंत अभिमानाने नमूद केले.

Comments
Add Comment

Baloch Liberation Army : बलुचिस्तानमध्ये सुरक्षा दलांवर मोठा हल्ला; बीएलएचा १८ जवान ठार केल्याचा दावा

बलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलांच्या ताफ्यावर मोठा हल्ला झाल्याने परिसरात तणाव

Shocking medical mystery : ३८ आठवड्यांची प्रेग्नंट अन् सीझरच्या वेळी गर्भात बाळच नाही! डॉक्टरांना धक्का, पोलिसांच्या तपासात उघड झाले 'हे' भयंकर सत्य

एका महिलेला ३८ आठवड्यांची गरोदर असल्याचे सांगून रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबीयांच्या हातात

Tibet Earthquake : तिबेटमध्ये रिश्टर स्केलवर ५.० तीव्रतेचा भूकंप

ल्हासा : तिबेटमध्ये गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 नोंदवण्यात

Nepal climate change news : नेपाळमध्ये हवामान बदलाचा महाप्रलय : "प्रदूषण करणाऱ्या देशांनीच भरपाई द्यावी!" नेपाळची आक्रमक भूमिका

नेपाळ-तिबेट सीमेवर झालेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर आता राजकीय आणि हवामान न्यायाच्या (Climate Justice) संघर्षाला तोंड

Nepal Flood Disaster : मृतांचा आकडा १२०० पार, ४ हजारांहून अधिक जण बेपत्ता

काठमांडू : नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या विनाशकारी अचानक आलेल्या पुरामुळे संपूर्ण देशात हाहाकार माजला असून, या

Trump Strait Hormuz : ‘होर्मुझ स्ट्रेट’ आता ‘ट्रम्प स्ट्रेट’? डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावाने खळबळ

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या होर्मुझच्या