IndiGo flight accident : नवी मुंबईहून श्रीनगरला जाणारे इंडिगोचे विमान विमानतळावर पार्किंग करताना खांबाला धडकले; सर्व प्रवासी सुरक्षित
September 4, 2026 01:16 PM
Srinagar : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी एक मोठा अपघात टळला. नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेले इंडिगो एअरलाइन्सचे विमान लँडिंगनंतर पार्किंग बे कडे जात असताना रनवेवरील पोलला जाऊन धडकले. या धडकेमुळे विमानाचे पुढच्या भागाचे (नोज सेक्शन) किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने विमानात सवार सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
विजुअल डॉकिंग गाइडेंस सिस्टम पोलला धडक
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९:०२ च्या सुमारास नवी मुंबईहून श्रीनगरला आलेले इंडिगोचे '6E 225' (VT-NOG) हे विमान श्रीनगर विमानतळावरील 'बे नंबर ०६' कडे पार्क करण्यासाठी जात होते. याच दरम्यान विमानाचे नियंत्रण सुटल्याने ते विजुअल डॉकिंग गाइडेंस सिस्टम (VDGS) च्या पोलला जाऊन धडकले. या पोलवर लेझर आणि कॅमेरा सेन्सर्स बसवलेले असतात. ब्रेकिंग सिस्टिम फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Dr. Shobha Bachhav's mobile hacked : धुळे लोकसभा मतदारसंघाच्या (Dhule Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव (MP Shobha Bachhav) यांचा मोबाईल हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. सायबर ...
मॅन्युअल पायऱ्यांचा वापर करून प्रवाशांना बाहेर काढले
अपघाताची माहिती मिळताच विमानतळ प्राधिकरणाने तत्परता दाखवत बचावकार्य सुरू केले. विमानातील सर्व प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना मॅन्युअल पायऱ्यांचा वापर करून अतिशय सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या अपघाताचे नेमके कारण काय होते, याची सखोल चौकशी नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून केली जात आहे.
विमानतळावरील वाहतूक सुरळीत
या घटनेनंतरही श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे आणि इतर कामकाज पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. प्रवाशांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले.
Nashik : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) दत्तक घेतलेल्या घनशेत (ता. पेठ) गावातील १३ विद्यार्थ्यांची 'पवित्र पोर्टल'च्या ...
इंडिगोच्या पायलटची प्रकृती बिघडल्याने विमान डायव्हर्ट
दरम्यान, गुरुवारीच इंडिगोच्या आणखी एका विमानाबाबत मोठी अपडेट समोर आली होती. दोहाहून बंगळुरूकडे जाणाऱ्या '6E 1302' या फ्लाइटच्या मुख्य वैमानिकाची (पायलट-इन-कमांड) अचानक प्रकृती बिघडल्याने विमानाचे मस्कटमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. तेथे पायलटवर उपचार करून प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची सोय करण्यात आली होती.