Navi Mumbai Crime : नवी मुंबईत संतापजनक प्रकार! स्कूल बस चालकाकडून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपीला अटक



Navi Mumbai : नवी मुंबईतील कामोठे परिसरातून एक मन सुन्न करणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेच्या खाजगी बस चालकाने अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्कूल बसमधील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर ही पीडित चिमुकली शेवटी बसमध्ये एकटीच उरली होती. याच गोष्टीचा गैरफायदा घेत नराधम चालकाने तिच्यावर हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३० वर्षीय चालकाला अटक केली असून पनवेल न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.



नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली दररोज इतर मुलांसोबत याच खाजगी स्कूल बसने शाळेत ये-जा करत असे. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी चालकाने केजी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यास सुरुवात केली. एकेक करून सर्व मुले आपापल्या थांब्यावर उतरली, मात्र शेवटी ही तीन वर्षांची चिमुकली एकटीच बसमध्ये राहिली. संधी साधत नराधम चालकाने तिच्यावर अत्याचार केला.



चिमुकलीने आजीला सांगितली कहाणी


घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीला पोटात तीव्र दुखू लागले. तिने रडत आपल्या आजीला "बसच्या ड्रायव्हर काकांनी त्रास दिला," असे सांगितले. चिमुकलीच्या तोंडून हे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ शाळा प्रशासनाला जाब विचारला आणि पोलिसांत धाव घेतली. मुलीच्या वैद्यकीय तपासणीमध्ये अत्याचाराची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला.



पोलिसांची कठोर कारवाई


या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील १२ वर्षांखालील बालकावरील बलात्काराशी संबंधित अत्यंत कठोर कलमे आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. गुरुवारी आरोपीला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गंभीर प्रकरणात शाळा प्रशासनातील इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात असून त्यांचे जबाब नोंदवले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप उसळला असून स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




Comments
Add Comment

Irina Rudakova : 'मुंबईतील हे वर्तन थांबले पाहिजे'; ऑटो चालकाला धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याप्रकरणी बिग बॉस फेम इरिना रुडाकोव्हा आक्रमक  

Mumbai : 'बिग बॉस मराठी ५' फेम आणि रशियन मॉडेल-अभिनेत्री इरिना रुडाको

Ahilyanagar : पुण्यातील तरुणाचं अपहरण करून उत्तर प्रदेशला नेण्याचा कट पोलिसांनी उधळला ! समृद्धी महामार्गावर 3 किमी सिनेस्टाईल पाठलाग

Ahilyanagar : पुण्यातून २४ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला थेट उत्तर प्रदेशात घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकार समृद्धी

Jalgaon Crime : मुलाच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून कुटुंबीयांनीच संपवलं ? महिनाभरानंतर आत्महत्येचं गूढ उकललं

Jalgaon Crime : जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (MIDC Police Station) हद्दीतील मोहाडी गावात ३१ जुलै रोजी घडलेल्या युवकाच्या कथित

BMC Corporators Tablet : नगरसेवकांच्या हाती टॅब पडण्यापूर्वी खरेदीची फाईल बंद; ऍपलच्या टॅबवरील खर्चाचा आकडा पाहून प्रशासनाने घेतला आखडता हात?

मुंबई (सचिन धानजी) : मुंबइ महापालिकेतील कारभार पेपरलेस करण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने नगरसेवकांना टॅब

Heartwarming display of friendship : महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यात मैत्रीचा गोडवा; एकमेकांना भरवली जिलेबी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून मुंबईतील महापालिकेतील भाजपच्या नेत्यांमध्ये वाद निर्माण करून

BMC News : बांधकामाचा अनधिकृत राडोराडा प्रकरणांत पाच महिन्यांत ३१.६४लाखांचा दंड वसूल; स्वच्छतेच्या नवीन उपविधीनुसार ५२५६ लोकांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत बांधकाम व पाडकाम कचऱ्याच्या अनधिकृत विल्हेवाटीमुळे रस्त्यांवरील धूळ,