नवी दिल्ली : इटलीच्या राजकीय इतिहासात पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Gorgia Meloni) यांनी एक सुवर्णपान लिहिलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कालखंडात सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा अभूतपूर्व विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला आहे. ४ सप्टेंबर २०२६ रोजी मेलोनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सत्तेत १,४१३ दिवस पूर्ण केले. या ऐतिहासिक यशानंतर जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी विशेष शब्दांत त्यांचे अभिनंदन केले आहे.
Congratulations to my friend Prime Minister Meloni on becoming the longest continuously serving Prime Minister in Italy's postwar history. This milestone is a reflection of the trust and confidence of the Italian people in her leadership. Her friendship has also been…
— Narendra Modi (@narendramodi) September 4, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक भावूक आणि आदरयुक्त पोस्ट शेअर केली. मेलोनी यांचा ‘माझी मैत्रीण’ असा सार्थ उल्लेख करत मोदींनी लिहिले की, "युद्धोत्तर इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणे, हा इटलीच्या जनतेचा तुमच्या नेतृत्वावर आणि धोरणांवर असलेला दृढ विश्वास दर्शवतो." भारत आणि इटली यांच्यातील वाढत्या मैत्रीचा पुनरुच्चार करत त्यांनी पुढे म्हटले की, या धोरणात्मक भागीदारीमुळे दोन्ही देशांतील नागरिकांच्या समृद्धीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र काम करण्याची आमची कटिबद्धता अधिक मजबूत झाली आहे.
मुंबई : दिवसरात्र मेहनत करून प्रवाशांची सेवा करणाऱ्या ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक पाऊल उचलले आहे. ज्येष्ठ ...
मेलोनी यांनी हा टप्पा गाठताना इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी यांचा जुना विक्रम मोडीत काढला. बर्लुस्कोनी यांचे सरकार २००१ ते २००५ दरम्यान १,४१२ दिवस सत्तेवर होते. इटलीचा राजकीय इतिहास हा प्रामुख्याने राजकीय अस्थिरतेसाठी ओळखला जातो; गेल्या ८० वर्षांत देशाने तब्बल ६८ सरकारे पाहिली आहेत, जिथे एका मंत्रिमंडळाचा सरासरी कार्यकाळ अवघा १४ महिन्यांचा राहिला आहे. अशा पार्श्वभूमीवर मेलोनी यांनी १,४१३ दिवसांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करणे, ही इटलीतील राजकीय स्थैर्याची अत्यंत महत्त्वपूर्ण नांदी मानली जात आहे.
नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यातील सौहार्दाच्या संबंधांमुळे भारत-इटली द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांदरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा आणि व्यापाराच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. राजकीय वर्तुळात या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीची नेहमीच चर्चा असते. यापूर्वी जून २०२६ मध्ये नरेंद्र मोदी यांनी भारतातील दीर्घकालीन पंतप्रधानपदाचा टप्पा पार केला होता, तेव्हा मेलोनी यांनीही त्यांचे असेच मनापासून अभिनंदन केले होते. आता मेलोनी यांच्या या विक्रमावर मोदींनी दिलेल्या शुभेच्छांमुळे दोन्ही देशांतील राजनैतिक बंध अधिक दृढ झाले आहेत.






