Delhi Airport Flooded : मुसळधार पावसाने दिल्ली विमानतळ पाण्याखाली! टर्मिनलवर साचले पाणी, प्रवाशांचे हाल अन् IMD कडून 'यलो अलर्ट' जारी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा मोठा फटका दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला (IGI Airport) बसला आहे. पावसानंतर विमानतळाच्या प्रवेशद्वाराबाहेर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे समोर आले आहे. जमिनीवर साचलेल्या पाण्यात प्रकाशाचे किरण परावर्तित होत असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून, या पाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.



प्रवाशांचे हाल; ट्रॉली ढकलत अन् पायजमा दुमडून करावा लागला प्रवास




विमानतळ परिसरात साचलेल्या पाण्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. अनेक प्रवासी पेंट/पायजमा दुमडून पाण्याच्या मधूनच आपल्या ट्रॉली ढकलत अॅराइव्हल (Arrival) गेट्सच्या दिशेने जाताना दिसले. "मी गेल्या अर्ध्या तासापासून येथे उभी आहे आणि पाणी थोडे ओसरण्याची वाट पाहत आहे. असा प्रकार मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता," अशी प्रतिक्रिया मानसी आणि हिमांशी या महिला प्रवाशांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. कृष्ण जन्माष्टमीच्या सणादरम्यानच पाऊस पडल्याने प्रवाशांची धावपळ अधिकच वाढली.



हवामान विभागाची (IMD) आकडेवारी अन् पावसाची नोंद



भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या ३ तासांच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील पालम भागात सकाळी ११.३० ते दुपारी २.३० दरम्यान ३.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर नजफगड परिसरात सकाळी ८.३० ते ११.३० दरम्यान ०.५ मिमी पाऊस पडला. दिल्लीतील इतर बहुतांश केंद्रांवर या कालावधीत पाऊस पडला नसला तरी, अचानक आलेल्या मुसळधार सरिमुळे सकल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली.



दिल्लीला 'यलो अलर्ट'; वाहतूक कोंडीची शक्यता


विमानतळासह दिल्लीतील सखल भाग आणि अंडरपासमध्ये पाणी साचल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हवामान विभागाने संपूर्ण दिल्लीसाठी 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला आहे. पावसामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, सार्वजनिक वाहतूक सेवेलाही विलंब होत आहे. नागरिकांनी आणि प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीचे अपडेट्स तपासावेत, तसेच विजांच्या कडकडाटादरम्यान विजेचे खांब व तारांपासून दूर राहावे, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.



पुढील काही तास महत्त्वाचे; ६० किमी वेगाने वारे वाहणार


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात पुढील काही तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत ५० ते १०० मिमी पाऊस पडू शकतो. या काळात ताशी ४० ते ५० किमी वेगाने, तर काही वेळा ताशी ६० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Priyanka Chopra Karl Lagerfeld Award : ग्लोबल फॅशनविश्वात प्रियांका चोप्राचा डंका! पॅरिसमध्ये प्रदान करणार मानाचा 'कार्ल लेगरफेल्ड पुरस्कार'

पॅरिस : बॉलिवूड ते हॉलिवूड (Bollywood To Hollywood) असा प्रवास करणारी ‘ग्लोबल आयकॉन’ प्रियांका चोप्रा जोनस (Priyanka Chopra Jonas) हिने

Ind vs Pak Women's Asia Cup 2026 : महामुकाबल्याचा काऊंटडाऊन! महिला आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार; सामना कधी, कुठे आणि कसा पाहाल? वाचा सविस्तर

दुबई : महिला आशिया कप २०२६ स्पर्धेत आधीच उपांत्य फेरीत धडक मारल्यानंतर भारतीय महिला संघ आता आपल्या साखळी फेरीतील

Mumbai Valsad passenger gambling video : मुंबई-वलसाड पॅसेंजर ट्रेनमध्ये जुगाराचा खेळ अन् सीटवर चक्क... व्हायरल व्हिडिओने खळबळ!

मुंबई : मुंबई सेंट्रल (Mumbai Central) ते वलसाड (Walsad) दरम्यान जाणाऱ्या ५९०२३ जलद पॅसेंजर ट्रेनमध्ये काही प्रवाशांकडून चक्क

BCCI Action 62 Players : BCCI ची धडक कारवाई; रोहितसह ६२ खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी, अंडर-१९ वर्ल्ड कप विजेत्याचाही समावेश

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. वयाची खोटी कागदपत्रे आणि चुकीच्या नोंदी सादर

Indian Army : भारतीय सैन्याचे दोन जवान शहीद, नदीत वाहून गेले

नवी दिल्ली : हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील हथनीकुंड बॅरेज येथे सराव सुरू असताना एक अपघात झाला. या अपघातामुळे

PM modi congratulates Meloni : "माझ्या मैत्रिणीचे अभिनंदन!" इटलीत मेलोनींचा '८० वर्षांचा' ऐतिहासिक विक्रम; मोदींकडून खास शुभेच्छा!

नवी दिल्ली : इटलीच्या राजकीय इतिहासात पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Gorgia Meloni) यांनी एक सुवर्णपान लिहिलं आहे. दुसऱ्या