कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील तीव्र स्पर्धेत गूगलने आपले स्थान पुन्हा भक्कम केले आहे. OpenAI आणि अँथ्रॉपिकसारख्या बलाढ्य कंपन्यांशी दोन हात ...
ॲपल कंपनीचा नव्या मोबाईलचा लाँचिंग सोहळा भारतीय वेळेनुसार बुधवार नऊ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम कंपनीचे नवे सीईओ जॉन टर्नस यांच्या नेतृत्वात होत असलेला पहिला मोठा सोहळा आहे. स्टँडर्ड आयफोन १८ चे लाँचिंग २०२७ पर्यंत पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : आजच्या डिजिटल युगात UPI पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून काही सेकंदांत पैसे पाठवणे किंवा ...
रशिया - युक्रेन युद्ध तसेच अमेरिका - इराण युद्ध या दोन युद्धांमुळे अनेक वस्तू आणि सेवांच्या दरात वाढ झाली आहे. एआयमुळे मेमरी कार्डच्या मागणीत वाढ झाली आहे. याचा परिणाम मोबाईल, लॅपटॉप, पीसी यांच्या किंमतींवरही झाला आहे. त्यामुळे आयफोन सीरिजमधील नव्या मोबाईलच्या किंमती किती असतील यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत. काही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार भारतात आयफोन १८ प्रो ची किंमत एक लाख ३४ हजार किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.तसेच आयफोन १८ प्रो मॅक्सची किंमत १.५५ ते १.७५ लाखांदरम्यान असण्याची शक्यता आहे. तर आयफोन फोल्डची किंमत दीड लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
सायबर विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन https://prahaar.in/2026/08/20/25-year-old-woman-apologizes-over-ladakh-dispute-my-remarks-were-wrong-i-have-always-respected-the-army/ मुंबई : कृत्रिम ...
आयफोन १८ प्रो मध्ये ६.३-इंचाचा डिस्प्ले कायम राहण्याची शक्यता आहे, तर प्रो मॅक्समध्ये ६.९-इंचाची स्क्रीन कायम राहू शकते. दोन्हीमध्ये १२०Hz रिफ्रेश रेट असलेले OLED पॅनल वापरले जाण्याची शक्यता आहे. डिझाइनमधील कथित बदलांपैकी एक म्हणजे लहान 'डायनॅमिक आयलँड'. काही अहवालांनुसार, ॲपल डिस्प्लेच्या खाली फेस आयडीचा वापर करू शकते. आयफोन १८ प्रो आकाशी निळा, पूर्ण काळा आणि बरगंडी रंगांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. पण कंपनीने या वैशिष्ट्यांबाबत अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही, त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
कॅमेऱ्यांचा सेटअप आयफोन १८ प्रो मध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. मागील बाजूस तीन ४८ मेगापिक्सेलचे कॅमेरे आणि फ्रंट साइडला २४ मेगापिक्सेल पर्यंतचा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. कॅमेऱ्यातील सर्वात मोठा बदल व्हेरिएबल अपार्चर असलेला मुख्य कॅमेरा हा असू शकतो. यामुळे लेन्सला कॅमेऱ्यात येणारा प्रकाश नियंत्रित करता येईल. हे वैशिष्ट्य फक्त प्रो मॅक्स मॉडेलमध्येच असण्याची शक्यता आहे. A20 प्रो चिप आयफोन १८ प्रो मध्ये वापरली जाण्याची शक्यता आहे. तसेच या फोनमध्ये १२ जीबी रॅम सी टू मॉडेम असण्याची शक्यता आहे. आयफोन १८ प्रो मध्ये ग्राफिक्सची कार्यक्षमता १८ टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
लाँच होणार असलेला आयफोन फोल्ड उघडल्यावर ७.८ इंचाच्या स्क्रीन आणि ५.५ इंचाच्या कव्हर डिस्प्लेमध्ये उपलब्ध असेल. उघडल्यानंतरची फोनची जाडी ४.५ मिमी असण्याची शक्यता आहे. आयफोन फोल्ड मध्ये ४८ मेगापिक्सेलचे मागील कॅमेरे असण्याची शक्यता आहे आणि त्यात दोन फ्रंट-फेसिंग कॅमेरेही असण्याची शक्यता आहे. फोल्डिंगच्या फोनमध्ये ॲक्सेससाठी फेस ऐवजी टच आयडी हा पर्याय असण्याची शक्यता आहे.