Jalgaon : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव–शिरसोली–म्हसावद रेल्वे मार्गावर (Jalgaon–Shirsoli–Mhasavad Railway Line) महत्त्वाचे तांत्रिक काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गावरील अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसविण्यात येणार आहे. या कामामुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या कामाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होणार असून नाशिककडे धावणाऱ्या काही महत्त्वाच्या मेमू गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. काही गाड्यांचे नियमन आणि वेळापत्रकातही बदल करण्यात येणार आहेत.
स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली (Automatic Block Signalling System) बसविण्याच्या कामासाठी सोमवार, 7 सप्टेंबर रोजी पूर्व नॉन-इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवार, 8 सप्टेंबर रोजी नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती घेतले जाणार आहे. मंगळवारी, 8 सप्टेंबर रोजी जळगाव–शिरसोली–म्हसावद दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 12 तासांचा ट्रॅफिक ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या तांत्रिक कामामुळे नाशिकच्या दिशेने धावणाऱ्या मेमू गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. काही गाड्या रद्द, तर काही गाड्यांचे नियमन आणि पुनर्निर्धारण केले जाणार आहे.
०८ सप्टेंबर रोजी 'या' गाड्या रद्द
११११९ इगतपुरी–भुसावळ मेमू रद्द
१११२० भुसावळ–इगतपुरी मेमू रद्द
११११३ भुसावळ–देवळाली मेमू रद्द
११११४ देवळाली–भुसावळ मेमू रद्द
६११२९ नाशिक रोड–बडनेरा मेमू रद्द
६११३० बडनेरा–नाशिक रोड मेमू रद्द
०८ सप्टेंबर रोजी गाडयांचे नियमन
२२५९० हडपसर–बनारस अमृत भारत एक्सप्रेस माहेजी स्थानकावर येथे ०२ तास ५० मिनिटे नियमन.
१२६२७ बेंगलोर–नई दिल्ली एक्सप्रेस पाचोरा स्थानकावर ०१ तास ४० मिनिटे नियमन.
११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस–छपरा एक्सप्रेस गाळन स्थानकावर ०१ तास ३५ मिनिटे नियमन.
२२३६० मुंबई–पटना एक्सप्रेस कजगाव स्थानकावर ०१ तास १५ मिनिटे नियमन.
१७३६३ हुबळी–योग नगरी ऋषिकेश एक्सप्रेस वाघळी स्थानकावर ०१ तास १० मिनिटे नियमन.
११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस–जयनगर एक्सप्रेस चाळीसगाव स्थानकावर ०१ तास नियमन.
२२५११ लोकमान्य टिळक टर्मिनस–कामाख्या एक्सप्रेस हिरापूर स्थानकावर १५ मिनिटे नियमन.
११०७२ बलिया–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस भादली स्थानकावर २ तास ४५ मिनिटे नियमन.
२२५८९ बनारस–हडपसर अमृत भारत एक्सप्रेस भुसावळ स्थानकावर ०२ तास ३० मिनिटे नियमन.
११०५८ अमृतसर–मुंबई एक्सप्रेस भुसावळ स्थानकावर ०१ तास ४५ मिनिटे नियमन.
२२८४६ हटिया–पुणे एक्सप्रेस वरणगाव स्थानकावर ०१ तास ४५ मिनिटे नियमन.
२२५३७ गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दुसखेडा स्थानकावर ०१ तास ३५ मिनिटे नियमन.
११०६२ जयनगर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस सावदा स्थानकावर ०१ तास १५ मिनिटे नियमन.
११०४० गोंदिया–कोल्हापूर एक्सप्रेस बोदवड स्थानकावर ०१ तास नियमन.
११०११ मुंबई–धुळे एक्सप्रेस नांदगाव स्थानकावर २० मिनिटे नियमन.
१२७५३ हजुर साहिब नांदेड–हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस कजगाव स्थानकावर ०१ तास २५ मिनिटे नियमन.
१२७१५ हजुर साहिब नांदेड–अमृतसर एक्सप्रेस नायडोंगरी स्थानकावर ४० मिनिटे नियमन.
१२१०३ पुणे–लखनऊ एक्सप्रेस हिसवळ स्थानकावर २० मिनिटे नियमन.
गाड्यांचे पुनः निर्धारण
२६१०२ अजनी–पुणे वंदे भारत एक्सप्रेस प्रवास प्रारंभ दिनांक ०८ सप्टेंबर रोजी अजनी येथून १२.५० वाजता सुटेल. (निर्धारित सुटण्याची वेळ ०९.५० वाजता).






