मुंबई : दहिहंडीचा उत्साह आणि जल्लोष सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. गोविंदा पथकांचा थरार, उंचच उंच मानवी मनोरे आणि ढोल-ताशांच्या गजरात दहिहंडी फोडण्याचा उत्साह यामुळे वातावरणात जल्लोष पाहायला मिळतोय. अशातच अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा दहिहंडी सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये पद्मिनी कोल्हापुरे यांना हिंदी गाणं गाण्याची फरमाईश केलेली असताना असताना त्यांनी आधी मराठी गाणं गायलं. (Padmini Kolhapure Viral Video)
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे मागाठाणे येथील दहिकाला उत्सवाला हजेरी लावली होती. तिथे आयोजकांकडून त्यांना गाणे गाण्याची विनंती करण्यात आली. यावेळी आयोजकांनी पद्मिनी कोल्हापुरेला तिच्या गाजलेल्या 'प्रेम रोग' या सिनेमातील 'तेरा यहां कोई नहीं' हे गाणं गाण्यास सांगितलं. त्यानुसार या गाण्याचे म्युझिक लावण्यात आलं. मात्र त्यानंतर पद्मिनीने जे म्हटलं त्याने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आणि आपसूकच चेहऱ्यावर हसूही आणलं. (Padmini Kolhapure Viral Video)
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज गोपाळकाला म्हणजेच दहीहंडीचा (Dahihandi 2026) सण अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. थरांवर थर रचत दहीहंडी ...
'तेरा यहां कोई नहीं' या गाण्याचे म्युझिक सुरू असतानाच पद्मिनी कोल्हापुरेने "मी आधी मराठी गाणं गाईन" असं सांगत मराठी गायला सुरुवात केली. त्यानंतर हिंदी गाण्याचं म्युझिक थांबवण्यात आलं. पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांच्या चिमणी पाखरं सिनेमातील सोन्याचा संसार हे गाणं गायलं. त्यानंतर त्यांनी 'तेरा यहां कोई नहीं' हे गाणं गायलं.
पद्मिनी कोल्हापुरेचं मराठी भाषेवर आणि मराठी मनोरंजनविश्वाशी असलेलं नातं यानिमित्ताने पुन्हा पाहायला मिळालं. तिने बॉलिवूडमध्ये मोठी ओळख निर्माण केली असली तरीही तिची मराठीशी नाळ कायम जोडलेली राहिली. पद्मिनी कोल्हापुरेचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. (Padmini Kolhapure Viral Video)
मुंबई : दहिसर पोलिसांनी टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
‘चिमणी पाखरं’ हा अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या कारकिर्दीतील एकमेव मराठी सिनेमा आहे. अभिनेता सचिन खेडेकर यांच्यासोबत त्यांनी या चित्रपटात काम केलं होतं. मराठीतील काही निवडक कल्ट सिनेमांमध्ये ‘चिमणी पाखरं’चा आवर्जून उल्लेख केला जातो. चित्रपटाची हृदयस्पर्शी कथा आणि त्यातील भावूक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
दरम्यान, आज दहीहंडीच्या निमित्ताने पद्मिनी कोल्हापुरे यांनी गायलेल्या एका गाण्यामुळे ‘चिमणी पाखरं’च्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे. या गाण्याने प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्या काळात नेलं असून, चित्रपटातील भावनिक प्रसंग आणि आठवणींना उजाळा मिळत आहे. (Padmini Kolhapure Viral Video)





