Saturday, September 5, 2026

Dahi Handi 2026 : मुंबईत दहीहंडीचा उत्साह : मानवी मनोरे रचताना २२ गोविंदा जखमी, २१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज

Dahi Handi 2026 : मुंबईत दहीहंडीचा उत्साह : मानवी मनोरे रचताना २२ गोविंदा जखमी, २१ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज गोपाळकाला म्हणजेच दहीहंडीचा (Dahihandi 2026) सण अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. थरांवर थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. मात्र, या उत्सवाच्या उत्साहादरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटना घडून काही गोविंदा जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पालिका व सरकारी रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी १२:०० वाजेपर्यंत शहर आणि उपनगरांत मिळून एकूण २२ गोविंदा जखमी झाले आहेत. सुदैवाने यातील बहुतांश गोविंदांना किरकोळ दुखापत झाली असून २१ जणांवर वेळेत उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

विभागनिहाय रुग्णालयांची आकडेवारी (दुपारी १२ वाजेपर्यंत):

मुंबई शहर भाग (City Hospitals): एकूण जखमी: २० उपचार सुरू असलेले: ०० डिस्चार्ज दिलेले: २० (शहर भागातील सर्व २० जखमी गोविंदांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले आहे.) पूर्व उपनगर (Eastern Suburbs Hospitals): एकूण जखमी: ०१ उपचार सुरू असलेले: ०० डिस्चार्ज दिलेले: ०१ पश्चिम उपनगर (Western Suburbs Hospitals): एकूण जखमी : ०१ उपचार सुरू असलेले : ०१ डिस्चार्ज दिलेले : ००

एकूण परिस्थिती

आज दुपारी १२ वाजेपर्यंत नोंदवलेल्या आकडेवारीनुसार एकूण २२ जखमींपैकी तब्बल २१ गोविंदांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर सध्या केवळ ०१ गोविंदावर पश्चिम उपनगरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रशासनाने आणि पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टर तैनात ठेवले आहेत. सुरक्षा नियमांचे पालन करून आणि प्रथमोपचाराची व्यवस्था सोबत ठेवूनच मानवी मनोरे रचावेत, असे आवाहन प्रशासनाकडून गोविंदा पथकांना करण्यात येत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >