Nagpur Crime : डान्स क्लासला जाण्यावरून पती-पत्नीत वाद; मद्यधुंद पतीकडून झालेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

नागपूर : डान्स क्लासला जाण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मद्यधुंद पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामिनी कृष्ण लाल यादव (३८) असे मृत महिलेचे नाव असून, कृष्ण लाल यादव (४१) असे आरोपी पतीचे नाव आहे. (Nagpur Crime)


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यामिनी आणि कृष्ण लाल हे नागपुरात त्यांच्या दोन मुलांसह राहत होते. यामिनीला सोसायटीमध्ये सुरू असलेल्या डान्स क्लासला जायचे होते. मात्र, त्याचवेळी कामावरून घरी परतलेल्या कृष्ण लालने तिला स्वतःसह मुलांसाठी जेवण तयार करण्यास सांगितले. यामिनीने डान्स क्लासला जाण्याचा निर्णय कायम ठेवत स्वयंपाक करण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. (Nagpur Crime)



वाद वाढत गेल्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील कृष्ण लालने दोन मुलांसमोरच यामिनीला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. त्याने तिच्या मानेवर आणि पोटावर लाथा मारल्याने तिला गंभीर अंतर्गत दुखापत झाली. मारहाणीनंतर यामिनीला मानेत आणि पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. प्रकृती बिघडत असल्याने तिने पतीला वेदनाशामक औषध आणण्यास सांगितले. कृष्ण लाल औषध आणण्यासाठी बाहेर गेला; मात्र जवळचे मेडिकल बंद असल्याने तो रिकाम्या हाताने परतला. (Nagpur Crime)



उपचारादरम्यान मृत्यू


काही वेळातच यामिनीच्या पोटाला मोठ्या प्रमाणात सूज आली आणि तिची प्रकृती चिंताजनक बनली. परिस्थिती गंभीर झाल्याचे लक्षात येताच कृष्ण लालने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र पोटातील गंभीर अंतर्गत दुखापतींमुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. (Nagpur Crime)



दोन मुलांसमोरच घडली मारहाण


या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यामिनीवर झालेली मारहाण तिच्या दोन लहान मुलांसमोरच झाल्याचे समोर आले आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला कौटुंबिक वाद, त्यात झालेले मद्यपान आणि त्यानंतरचा हिंसाचार एका कुटुंबासाठी आयुष्यभराची वेदना ठरला आहे. या प्रकरणामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागपूर पोलीस अधिक तपास करत आहेत. (Nagpur Crime)

Comments
Add Comment

Dahi Handi 2026 : मुंबईत तब्बल १६८ गोविंदा जखमी

मुंबईत शहरातच तब्बल १०६गोविंदा जखमी तब्बल२९ जखमी गोविंदांना रुग्णालयांत दाखल करण्याची आली वेळ मुंबई (विशेष

Solapur Crime : शेअर मार्केटमध्ये २० लाखांचं झालं नुकसान; कर्ज फेडण्यासाठी यूट्यूब व्हिडिओ पाहून घरफोडीचा प्रयत्न, पण घडलं काहीतरी वेगळंच...

सोलापूर : माढा तालुक्यातील जामगाव येथे घरफोडीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तरुणाने ६१ वर्षीय वृद्धाचा खून करून

Harmanpreet Kaur : भारत-पाकिस्तान सामन्यात हरमनप्रीत कौरचा ऐतिहासिक विक्रम; १५० T20I सामन्यांत कर्णधारपद भूषवणारी पहिली क्रिकेटपटू

दुबई : महिला आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली असून, या सामन्यात भारतीय

Ashish Shelar : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने सन २०२५ पासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा 'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' म्हणून

Haryana Viral Video : हरियाणात महिलेचा रस्त्यावर हंगामा; Ola चालकावर दारू फेकल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

हरियाणा : हरियाणातील एका वर्दळीच्या रस्त्यावर महिलेने गोंधळ घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

PM Narendra Modi : एसआरसीसीच्या शताब्दी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; विद्यार्थ्यांशी व प्रवाशांशी साधला संवाद

नवी दिल्ली : दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (SRCC) शताब्दी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी