मुंबई : मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्याला थेट जोडणाऱ्या कल्याण-लातूर जनकल्याण एक्सप्रेसवेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सुमारे ४४२ किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी असलेला हा ग्रीनफिल्ड, पूर्णपणे ॲक्सेस-कंट्रोल्ड एक्सप्रेसवे तयार झाल्यानंतर कल्याण ते लातूरचा प्रवास सध्याच्या १० ते ११ तासांवरून अवघ्या ४ तासांवर येण्याची अपेक्षा आहे. (Kalyan Latur Expressway)
या प्रकल्पासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) या महामार्गाचे काम केले जाणार आहे. या महामार्गामुळे ठाणे, कल्याण, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि लातूर हे भाग वेगाने जोडले जाणार आहेत. (Kalyan Latur Expressway)
माळशेज घाटात ८ किमीचा बोगदा
या एक्सप्रेसवेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माळशेज घाटात तब्बल ८ किलोमीटर लांबीचा बोगदा उभारला जाणार आहे. त्यामुळे घाटातील वळणावळणाचा रस्ता, वाहतूक कोंडी आणि प्रवासातील अडचणी कमी होण्याची अपेक्षा आहे.
माथेरान : थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमधून एक अत्यंत सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. अंबरनाथ येथून मित्रासोबत पर्यटनासाठी ...
मुंबईपासून मराठवाड्यापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार
कल्याण-लातूर एक्सप्रेसवे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या विरार-JNPT लिंक तसेच रिंग रोड नेटवर्कशी जोडला जाणार आहे. यामुळे मराठवाड्यातून मुंबई आणि JNPT बंदरापर्यंत मालवाहतूक अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे. तसेच हा मार्ग विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरलाही जोडला जाणार आहे. लातूरच्या दिशेला या एक्सप्रेसवेचा इंटरचेंज नागपूर-गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवेशी होणार आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि गोवा यांच्यातील दळणवळणालाही चालना मिळू शकते. (Kalyan Latur Expressway)
हा नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे सध्याच्या NH-61 (कल्याण-अहमदनगर-नांदेड हायवे) ला समांतर असणारा हायस्पीड कॉरिडॉर ठरेल. हा महामार्ग कल्याण, मुरबाड, माळशेज घाट (8 किमी टनल), ओतूर (आळेफाटा), अहिल्यानगर, पाथर्डी, बीड, मांजरसुंबा, अंबाजोगाई मार्गे लातूरला पोहोचेल. भविष्यात या महामार्गाचा विस्तार महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बिदर आणि गुलबर्गा मार्गापर्यंत करण्याचा प्रस्ताव आहे. (Kalyan Latur Expressway)