Gateway of India ferry boat : गेटवे ऑफ इंडियाजवळ फेरीबोट बंद; ३८ प्रवाशांची सुखरूप सुटका

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया येथून पर्यटकांना समुद्र सफरीसाठी घेऊन गेलेली ‘अन्वरी’ नावाची फेरीबोट समुद्रात अचानक बंद पडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. बोटीवर ३४ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स असे एकूण ३८ जण होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या तत्परतेने आणि जवळच असलेल्या ‘आझाद हिंद’ फेरीबोटीच्या मदतीने सर्व ३८ जणांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार, ‘अन्वरी’ फेरीबोट गेटवे ऑफ इंडियावरून पर्यटकांना घेऊन समुद्रात फेरफटका मारण्यासाठी गेली होती. रात्री साडेआठच्या सुमारास बोट गेटवेच्या दिशेने परतत असताना किनाऱ्यापासून सुमारे १.५ नॉटिकल मैल अंतरावर तिच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे बोट समुद्रातच थांबली. रात्रीची वेळ आणि समुद्रातील अंधारामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.



घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. बिट क्रमांक १ चे पोलीस अंमलदार अभिजित शिंदे आणि पोलीस निरीक्षक गुरव यांनी परिसरातील उपलब्ध बोटींची माहिती घेतली. त्यावेळी ‘आझाद हिंद’ फेरीबोट घटनास्थळाजवळ असल्याचे समोर आले.


पोलिसांनी ‘आझाद हिंद’चे मालक जुनेद मुल्ला यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर या बोटीवरील क्रूला तातडीने ‘अन्वरी’च्या मदतीसाठी पाठवण्यात आले. ‘आझाद हिंद’ घटनास्थळी पोहोचल्यानंतर बंद पडलेल्या फेरीबोटीला सुरक्षितपणे टो करून गेटवे ऑफ इंडियाच्या जेट्टी क्रमांक २ येथे रात्री सुमारे ९ वाजून १० मिनिटांनी आणण्यात आले.


या घटनेत सर्व ३४ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स सुरक्षित असून कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांची तत्परता आणि सहकारी फेरीबोटीच्या मदतीमुळे संभाव्य मोठा धोका टळला.

Comments
Add Comment

वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडचे बाधित क्षेत्र ४० हजार चौरस मीटरने वाढले, विकास नियोजन रस्ता आणि कोस्टल रोडची रुंदी वाढवणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई कोस्टल रोड उत्तरचे बांधकाम केले जात असून या प्रकल्प कामांसाठी वर्सोवा ते गोरेगाव

मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशन अडकले, आता कोस्टल रोडसाठी होणार त्याच जमिनीचे संपादन

मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या मोगरा नाल्याच्या बांधकामाला जमिन मालकाने आक्षेप घेत

अमेरिकेचा हा बडा नेता थेट मुंबईच्या रस्त्यावर; गेटवे ऑफ इंडियावर मुख्यमंत्र्यांसोबत नेमकं काय घडलं?

मुंबईच्या ऐतिहासिक आणि डौलदार अशा गेटवे ऑफ इंडिया परिसरात आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अनपेक्षित भेटीने

Mumbai Fire: कुर्ल्यात 12 मजली इमारतीत अग्नितांडव! 5 वर्षांच्या चिमुकल्यासह 9 जखमी; रूग्णावर उपचार सुरू

मुंबई: मुंबईतील कुर्ल्यामध्ये ऐन दसऱ्याच्या दिवशी आगीची घटना घडली आहे. कुर्ला पश्चिमेतील कोहिनूर HDIL इमारतीमध्ये

मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्प कामांचा आयुक्तांनी घेतला आढावा, आयुक्तांनी पुन्हा प्रकल्प कामांची कमान घेतली हाती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक सुगम आणि अखंड करण्याच्या उद्देशाने

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाच्या बोगदा खणन कामाला गती! ‘तुळशी’द्वारे १८३ मीटर खोदकाम पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड