Solapur Crime : शेअर मार्केटमध्ये २० लाखांचं झालं नुकसान; कर्ज फेडण्यासाठी यूट्यूब व्हिडिओ पाहून घरफोडीचा प्रयत्न, पण घडलं काहीतरी वेगळंच...

सोलापूर : माढा तालुक्यातील जामगाव येथे घरफोडीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तरुणाने ६१ वर्षीय वृद्धाचा खून करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेअर मार्केटमध्ये मोठे नुकसान झाल्याने झालेलं कर्ज फेडण्यासाठी आरोपीने चोरीचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अजयकुमार गौतम चव्हाण (वय ३१, रा. जामगाव, सध्या लऊळ, ता. माढा) याला कर्नाटकातील वाडी रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (Solapur Crime)


जामगाव येथे २५ ऑगस्टच्या रात्री ते २६ ऑगस्टच्या सकाळदरम्यान ही घटना घडली. अशोक भीमान्ना मुळे (वय ६१) यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपी शिरला होता. मुळे कुटुंबातील एका सदस्याने व्हॉट्सॲप स्टेटसवर तिरुपतीला जाण्याची माहिती ठेवली होती. हे स्टेटस पाहून घरातील सर्वजण बाहेर गेले असल्याचा अंदाज आरोपीने बांधला आणि चोरीचा कट रचला. (Solapur Crime)



पोलिसांच्या तपासानुसार, आरोपीने घराच्या मागील बाजूच्या पाण्याच्या पाइपवरून चढून प्रवेश केला. कुलूप तोडण्यासाठी त्याने यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून शिकलेली पद्धत वापरल्याचे समोर आले आहे. सिरिंजच्या साहाय्याने कुलूपात पेट्रोल टाकून ते पेटवण्यात आले आणि त्यानंतर कुलूप उघडण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.


घरातील कपाट उचकटताना झालेल्या आवाजाने अशोक मुळे जागे झाले. त्यांनी आरोपीला ओळखल्याने पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने त्यांच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. या हल्ल्यात मुळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने घरातून सुमारे २ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले. (Solapur Crime)



दरम्यान, आरोपीला शेअर मार्केटमध्ये सुमारे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याने तो कर्जबाजारी झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्ह्यानंतर मोबाईल बंद करून तो कर्नाटकात पळून गेला. स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा माग काढला आणि वाडी रेल्वे स्थानकावरून त्याला ताब्यात घेतले. आता पुढील तपास माढा पोलिस करत आहेत. (Solapur Crime)

Comments
Add Comment

Dahi Handi 2026 : मुंबईत तब्बल १६८ गोविंदा जखमी

मुंबईत शहरातच तब्बल १०६गोविंदा जखमी तब्बल२९ जखमी गोविंदांना रुग्णालयांत दाखल करण्याची आली वेळ मुंबई (विशेष

Harmanpreet Kaur : भारत-पाकिस्तान सामन्यात हरमनप्रीत कौरचा ऐतिहासिक विक्रम; १५० T20I सामन्यांत कर्णधारपद भूषवणारी पहिली क्रिकेटपटू

दुबई : महिला आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली असून, या सामन्यात भारतीय

Ashish Shelar : महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने सन २०२५ पासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा 'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' म्हणून

Haryana Viral Video : हरियाणात महिलेचा रस्त्यावर हंगामा; Ola चालकावर दारू फेकल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल

हरियाणा : हरियाणातील एका वर्दळीच्या रस्त्यावर महिलेने गोंधळ घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

PM Narendra Modi : एसआरसीसीच्या शताब्दी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; विद्यार्थ्यांशी व प्रवाशांशी साधला संवाद

नवी दिल्ली : दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (SRCC) शताब्दी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी

Nagpur Crime : डान्स क्लासला जाण्यावरून पती-पत्नीत वाद; मद्यधुंद पतीकडून झालेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

नागपूर : डान्स क्लासला जाण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मद्यधुंद पतीने पत्नीला बेदम मारहाण