Bolivia Military Base Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

बोलिव्हियामध्ये लष्करी तळावर झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राजधानी ला पाझपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या व्हियाचा (Viacha) येथील लष्करी तळावर शुक्रवारी हा स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. (Bolivia Military Base Explosion)


हा स्फोट लष्करी तळावरील पायरोटेक्निक म्हणजेच फटाके किंवा स्फोटक साहित्य साठवलेल्या ठिकाणी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. स्फोटाची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. मात्र, संरक्षण मंत्रालयाच्या फटाक्यांच्या साठ्यातून स्फोटाची सुरुवात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. (Bolivia Military Base Explosion)



मोठ्या प्रमाणात नुकसान, नागरिकही जखमी


स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, आजूबाजूच्या परिसरातील अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. जखमींमध्ये नागरिकांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. काही गंभीर जखमींना उपचारासाठी ला पाझमधील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. एका लहान मुलीला गंभीर भाजल्याची माहितीही समोर आली आहे. स्फोटानंतर अग्निशमन दल, पोलीस, लष्करी पथके आणि वैद्यकीय पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसर सुरक्षित करण्यात आला असून बचावकार्य सुरू आहे. (Bolivia Military Base Explosion)


दरम्यान, सुरुवातीच्या अहवालांमध्ये मृतांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार किमान दोन मृत्यू आणि १४ जण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. बचावकार्य आणि तपास सुरू असल्याने मृतांचा आणि बेपत्ता व्यक्तींचा आकडा बदलण्याची शक्यता आहे. घटनास्थळी अजूनही उष्णतेचा स्रोत असल्याने पुन्हा स्फोट होण्याचा धोका असल्याचा इशारा अग्निशमन दलाने दिला आहे. त्यामुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अजूनही या दुर्घटनेमागचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. (Bolivia Military Base Explosion)

Comments
Add Comment

Brazil election 2026: ट्रम्प यांचे निकटवर्तीय फ्लाव्हियो बोल्सोनारो यांचा पराभव! ब्राझीलमध्ये लुला दा सिल्वा यांची पुन्हा बाजी

ब्राझील : ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा

Iran US talks: इराणचा अमेरिकेला स्पष्ट इशारा! 7 अटी पूर्ण झाल्याशिवाय चर्चा नाही; कतारचे मध्यस्थ तेहरानमध्ये दाखल

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू असतानाच इराणने

Saudi Arabia Flights : सौदी अरेबियासाठी विमान प्रवासावर निर्बंध; एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअरची उड्डाणे स्थगित, प्रवाशांना परताव्याचा पर्याय

Saudi Arabia Flights : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातून सौदी अरेबियाला जाणाऱ्या काही विमानसेवा

Philippines Air Crash: दोन लष्करी विमानांचा अपघात, चार वैमानिकांचा मृत्यू

मनिला: फिलिपिन्समध्ये एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील हवाई तळावर नियमित प्रशिक्षण

टर्कीच्या खाणीत थरकाप उडवणारा स्फोट! काळजात धस्स आणणाऱ्या दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू, अजूनही एक जण आतच अडकले

अंकारा: टर्कीच्या उत्तर भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. काळ्या

Champi Cyclone: तैवानमध्ये ‘चांपी’ चक्रीवादळाचा हाहाकार; शाळा-कार्यालये बंद, शेकडो उड्डाणे रद्द!

ताइपे: तैवानमध्ये 'चांपी' चक्रीवादळाने धडक देण्यापूर्वीच हाहाकार माजवला आहे. ताशी 170 किलोमीटर वेगाने वाहणारे