Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल हत्याकांडाला नवे वळण; चेतन-सियाच्या वर्गमित्राची पोलिसांकडून चौकशी

पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. पोलिसांच्या तपासात आणखी एका व्यक्तीचे नाव समोर आले असून, या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्याला या प्रकरणात सहआरोपी केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Pune News)


पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती चेतन चौधरीचा वर्गमित्र आहे. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालसोबत घडलेल्या घटनेची त्याला आधीपासून माहिती होती का, याचा तपास सध्या सुरू आहे. चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी कथितरित्या या वर्गमित्रासोबत केतनला लोहगडावर नेण्यासंदर्भात चर्चा केली होती, असा पोलिसांना संशय आहे. (Ketan Agrawal Murder Case)



या व्यक्तीला लोहगडावर सोबत येण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्याने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. तरीही कथित कटाची त्याला माहिती होती का आणि त्याने कोणत्याही प्रकारे मदत केली का, याचा शोध पोलीस घेत आहेत. केतनच्या मृत्यूनंतर चेतनने या मित्राची भेट घेतल्याची माहितीही तपासात समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सिया गोयलही त्याच्या संपर्कात होती का, याची चौकशी केली जात आहे. (Pune Crime)



पुणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरु


चेतन चौधरीच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या संशयिताचा माग काढल्याचे सांगण्यात येत आहे. हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो चेतनच्या संपर्कात असल्याचेही तपासात समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. (Siya Goyal)


दरम्यान, केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर यापूर्वीच पोलिसांनी कारवाई केली आहे. लोहगड किल्ल्यावर केतनला कथितरित्या दरीत ढकलून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांकडून डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड आणि आरोपींच्या हालचालींचा तपास करण्यात येत आहे.  (Pune Police)


नवीन संशयिताच्या चौकशीतून 18 जूनच्या घटनेपूर्वी नेमकी कोणाला या कथित कटाची माहिती होती आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे केतन अग्रवाल हत्याकांडाचा तपास आता आणखी एका दिशेने पुढे सरकला आहे. (Ketan Agrawal News)

Comments
Add Comment

IPL 2027: कोणत्या खेळाडूंना संघ कायम ठेवणार? रिटेन्शनची शेवटचा तारीख जाहीर, गोव्यात होणार ऑक्शन

[caption id="attachment_1069478" align="aligncenter" width="800"] आयपीएल 2027 अर्थात 20व्या पर्वाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.आयपीएल 2027 साठी सर्व संघांनी

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार! WhatsApp वर APK फाइल न उघडताच ज्येष्ठ वकिलाला 3.80 लाखांचा गंडा

Nashik Crime : सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धतींचा वापर केला जात असल्याचे समोर येत आहे.

Breaking : भांडुप स्थानकात ट्रॅक ओलांडताना एसी लोकलच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी अंत

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सकाळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत वेळेत द्या; ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी-चाऱ्याचे नियोजन करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या

महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे बजेट ५ हजार कोटींवर नेण्याचे लक्ष्य - मंत्री नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला देशातील अग्रगण्य राज्यांच्या पंक्तीत आणण्यासाठी विभागाचे बजेट 212 कोटी

मुंबईत आठवड्यातून एक दिवस बांधकामे बंद ठेवा; वायुप्रदूषण रोखण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांची महापालिका आयुक्तांना सूचना

मुंबई : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी संपूर्ण मुंबई महापालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस