Dada Bhuse : अधिकारांना कात्री लावली नाही, मी स्वतः अधिकार विभाजित केले!

- शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे स्पष्टीकरण; नव्या शाखांना मान्यता देण्याचे अधिकार सचिव व आयुक्तांकडे सोपवण्याचा निर्णय स्वतः घेतल्याचा दावा


मुंबई : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या मान्यता आणि ना-हरकत प्रमाणपत्रांसंबंधीचे महत्त्वाचे अधिकार शिक्षणमंत्र्यांकडून काढून घेतल्याची चर्चा रंगली असताना, खुद्द शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. मंत्र्यांच्या अधिकारांना कात्री लावण्यात आलेली नसून, प्रशासकीय कामात सुटसुटीतपणा आणण्यासाठी आणि कामांची गर्दी होऊ नये म्हणून हा निर्णय आपण स्वतः घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Dada Bhuse)



राज्य सरकारच्या प्रशासकीय कारभारात गतिमानता आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाशी संबंधित काही अधिकार विभागाचे प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे सोपवण्यात आले आहेत. या निर्णयानुसार, आता स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये अतिरिक्त तुकड्यांना व नव्या शाखांना मान्यता देणे, तसेच सीबीएसई, आयसीएसई यांसारख्या विविध मंडळांच्या अभ्यासक्रमांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सचिव आणि आयुक्तांकडे असतील. पूर्वी या सर्व प्रस्तावांसाठी मंत्रालयात आणि मंत्री स्तरावर पाठपुरावा करावा लागत होता. (Dada Bhuse)



या बदलांमागे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ आणि शंभर टक्के ई-गव्हर्नन्स हे उद्दिष्ट असल्याचे भुसे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. राज्यात सुमारे ३१ हजार खासगी शाळा कार्यरत असून, वाढत्या शहरीकरणामुळे शाळांच्या मान्यता व नूतनीकरणाचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणावर येतात. हे अधिकार विकेंद्रित करून योग्य त्या स्तरावर दिल्याने प्रस्तावांच्या मंजुरी प्रक्रियेला वेग येईल आणि शाळा व्यवस्थापनांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Dada Bhuse)

Comments
Add Comment

Brain Tumour Survivor : ब्रेन ट्यूमरवर मात, आता डॉक्टर होण्याचं स्वप्न! ठाण्याच्या तरुणाची दशकभराची झुंज अखेर केईएम पर्यंत

ठाणे : आजारपण, उपचार आणि अनेक अडचणींवर मात करत एखादं स्वप्न पूर्ण करणं सोपं नसतं. मात्र ठाण्यातील एका ब्रेन ट्यूमर

Nora Fatehi Defamation Case : नोरा फतेही अडचणीत! ‘लेगो विमान’ म्हणणं पडलं महागात; थेट ३ कोटींचा मानहानीचा दावा

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेही सध्या कायदेशीर वादात अडकली आहे. एका विमान वाहतूक कंपनीने तिच्याविरोधात गांधीनगर

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरांचा लोणावळ्यात ₹70 कोटींचा ‘मास्टरस्ट्रोक’! 3.86 एकर जमीन खरेदी; नेमका काय आहे प्लॅन?

पुणे : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने विक्रमांचे डोंगर उभारणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी

Courier Scam : UK गिफ्टच्या आमिषाने सुरू झाला खेळ! कुरिअर ते CBI अधिकारी… असा रचला फसवणुकीचा सापळा

नागपूर : सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी झालेली ओळख एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला तब्बल २४ लाखांहून अधिक

Egypt Air Show : इजिप्तच्या आकाशात भारताचा ‘सारंग’ थरार! ‘डॉल्फिन लीप’सह नव्या कसरतीने जगाचे लक्ष वेधणार

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या शौर्याची आणि स्वदेशी एरोस्पेस क्षमतेची झलक आता इजिप्

Maharashtra Private Coaching Centres Act 2026 : खासगी शिकवणी केंद्र नियमन कायद्याच्या मसुद्यावर नागरिकांना सूचना-हरकती नोंदविण्यास १५ सप्टेंबरपर्यंत संधी

मुंबई : महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ च्या मसुद्याला राज्यभरातून मोठ्या