Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी फोडली ‘हंडी’

- २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी?; सचिन अहिर भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने तर्कवितर्कांना उधाण


मुंबई : उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडलेली ‘हंडी’ शनिवारी चर्चेचा विषय ठरली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तथा विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने ही २०२९ च्या विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Aditya Thackeray)


कृष्ण जन्माष्टमीनिमित्त वरळीतील जांबोरी मैदानात भाजपच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष उपस्थिती लावत गोविंदांचा उत्साह वाढवला. दहीहंडी फोडल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी सर्व नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. ‘ड्रग फ्री इंडिया, ड्रग फ्री महाराष्ट्र’ या संकल्पनेवर हा उत्सव आयोजित करण्यात आल्याचे सांगत, दहीहंडी हा सण महाराष्ट्राची संस्कृती, श्रद्धा आणि सामूहिक एकतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. गोविंदांनी एकमेकांना साथ देत मानवी मनोरे रचण्याची परंपरा ही आपल्या सामूहिक शक्तीची साक्ष देत असल्याचे ते म्हणाले. (Aditya Thackeray)



मात्र, या सर्व घडामोडींमागे वरळी मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा रंगली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा अवघ्या ८ हजार ८०१ मतांनी विजय झाला होता. त्यावेळी शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांनी निवडणूक लढवली होती. आता वरळीतील राजकारणात वेगाने बदल होत असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर हे दहीहंडीच्या निमित्ताने भाजपच्या व्यासपीठावर दिसून आले. त्यामुळे आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीचा हा गड राखणे अधिक आव्हानात्मक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Aditya Thackeray)



अंथरुणाला खिळलेल्या गोविंदाला प्रताप सरनाईकांकडून आधार


- दरम्यान, २००९ मधील दहीहंडी उत्सवात मानवी थरावरून खाली कोसळल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या आणि तेव्हापासून अंथरुणाला खिळून असलेल्या गोविंदा नागेश भोईर याच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी केली.
- भिवंडीतील गोविंदा नागेश भोईर याचा अवघ्या २४व्या वर्षी दहीहंडीच्या थरावरून कोसळून अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर गेली १८ वर्षे नागेश भोईर हा अंथरुणात आहे. काही दिवसांपूर्वी नागेशने आर्थिक मदत देण्यापेक्षा उपचारांचा खर्च शासनाने उचलण्याची मागणी केली होती. (Aditya Thackeray)

Comments
Add Comment

Brain Tumour Survivor : ब्रेन ट्यूमरवर मात, आता डॉक्टर होण्याचं स्वप्न! ठाण्याच्या तरुणाची दशकभराची झुंज अखेर केईएम पर्यंत

ठाणे : आजारपण, उपचार आणि अनेक अडचणींवर मात करत एखादं स्वप्न पूर्ण करणं सोपं नसतं. मात्र ठाण्यातील एका ब्रेन ट्यूमर

Nora Fatehi Defamation Case : नोरा फतेही अडचणीत! ‘लेगो विमान’ म्हणणं पडलं महागात; थेट ३ कोटींचा मानहानीचा दावा

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेही सध्या कायदेशीर वादात अडकली आहे. एका विमान वाहतूक कंपनीने तिच्याविरोधात गांधीनगर

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरांचा लोणावळ्यात ₹70 कोटींचा ‘मास्टरस्ट्रोक’! 3.86 एकर जमीन खरेदी; नेमका काय आहे प्लॅन?

पुणे : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने विक्रमांचे डोंगर उभारणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी

Courier Scam : UK गिफ्टच्या आमिषाने सुरू झाला खेळ! कुरिअर ते CBI अधिकारी… असा रचला फसवणुकीचा सापळा

नागपूर : सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी झालेली ओळख एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला तब्बल २४ लाखांहून अधिक

Egypt Air Show : इजिप्तच्या आकाशात भारताचा ‘सारंग’ थरार! ‘डॉल्फिन लीप’सह नव्या कसरतीने जगाचे लक्ष वेधणार

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या शौर्याची आणि स्वदेशी एरोस्पेस क्षमतेची झलक आता इजिप्

Maharashtra Private Coaching Centres Act 2026 : खासगी शिकवणी केंद्र नियमन कायद्याच्या मसुद्यावर नागरिकांना सूचना-हरकती नोंदविण्यास १५ सप्टेंबरपर्यंत संधी

मुंबई : महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ च्या मसुद्याला राज्यभरातून मोठ्या