पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. पोलिसांच्या तपासात आणखी एका व्यक्तीचे नाव समोर आले असून, या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्याला या प्रकरणात सहआरोपी केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Pune News)
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती चेतन चौधरीचा वर्गमित्र आहे. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालसोबत घडलेल्या घटनेची त्याला आधीपासून माहिती होती का, याचा तपास सध्या सुरू आहे. चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी कथितरित्या या वर्गमित्रासोबत केतनला लोहगडावर नेण्यासंदर्भात चर्चा केली होती, असा पोलिसांना संशय आहे. (Ketan Agrawal Murder Case)
पुणे : पुण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह सुरू असतानाच ध्वनी प्रदूषणाविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बिबवेवाडी परिसरातील श्रीकृष्ण तरुण ...
या व्यक्तीला लोहगडावर सोबत येण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्याने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. तरीही कथित कटाची त्याला माहिती होती का आणि त्याने कोणत्याही प्रकारे मदत केली का, याचा शोध पोलीस घेत आहेत. केतनच्या मृत्यूनंतर चेतनने या मित्राची भेट घेतल्याची माहितीही तपासात समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सिया गोयलही त्याच्या संपर्कात होती का, याची चौकशी केली जात आहे. (Pune Crime)
पुणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरु
चेतन चौधरीच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या संशयिताचा माग काढल्याचे सांगण्यात येत आहे. हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तो चेतनच्या संपर्कात असल्याचेही तपासात समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. (Siya Goyal)
दरम्यान, केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर यापूर्वीच पोलिसांनी कारवाई केली आहे. लोहगड किल्ल्यावर केतनला कथितरित्या दरीत ढकलून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांकडून डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड आणि आरोपींच्या हालचालींचा तपास करण्यात येत आहे. (Pune Police)
नवीन संशयिताच्या चौकशीतून 18 जूनच्या घटनेपूर्वी नेमकी कोणाला या कथित कटाची माहिती होती आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे केतन अग्रवाल हत्याकांडाचा तपास आता आणखी एका दिशेने पुढे सरकला आहे. (Ketan Agrawal News)






