Kurdus Dahi Handi : ना मोठे मानवी मनोरे, ना नेहमीची पद्धत; विहिरीत उडी घेत कुर्डुसमध्ये फोडतात दहीहंडी, पहा व्हिडिओ


रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कुर्डुस गावात दरवर्षी दहीहंडीचा एक अत्यंत अनोखा आणि थरारक सोहळा पाहायला मिळतो. एरवी दहीहंडी म्हटलं की थरावर थर रचून मानवी मनोरे उभे केले जातात. मात्र कुर्डुसमध्ये दहीहंडी साजरी करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे. येथे गोविंदा थेट विहिरीत उडी मारून दहीहंडी फोडतात. ही आगळीवेगळी परंपरा पाहण्यासाठी दरवर्षी स्थानिक नागरिकांसह मुंबई, पुणे आणि रायगड परिसरातून हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.



कुर्डुस गावाच्या मध्यभागी असलेल्या देऊळ आळी परिसरात एक मोठी विहीर आहे. ही विहीर सुमारे 40 फूट खोल असून तिच्यावर साधारण 25 फूट उंचीवर दहीहंडी बांधली जाते. हंडी फोडण्यासाठी गोविंदांना विहिरीच्या कठड्यावरून हवेत उंच झेप घ्यावी लागते. हवेत उडी मारून हंडीला स्पर्श करायचा आणि थेट विहिरीच्या पाण्यात उडी मारायची, अशी ही थरारक पद्धत आहे. गोविंदाचा हात हंडीला लागताच ती फुटली असे मानले जाते.




या अनोख्या परंपरेची सुरुवात 1992 मध्ये झाली. गावातील काही तरुण एकत्र आले आणि त्यांनी काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला. त्यातूनच विहिरीवर दहीहंडी साजरी करण्याची ही कल्पना पुढे आली. सुरुवातीला झाडांच्या फांद्यांचा आधार घेऊन हंडी फोडण्याचा प्रयत्न केला जायचा. मात्र हळूहळू विहिरीच्या कठड्यावरून उडी मारून हंडी फोडण्याची ही रोमांचक पद्धत रूढ झाली.

आज ही परंपरा संपूर्ण परिसरात 'एक गाव, एक दहीहंडी' म्हणून प्रसिद्ध झाली आहे. गेल्या तीन दशकांपासून कुर्डुसच्या गावकऱ्यांनी ही संस्कृती अतिशय उत्साहाने आणि गुण्यागोविंदाने जपून ठेवली आहे. विहिरीवर लटकवलेली हंडी, गोविंदांची धाडसी झेप आणि पाण्यात पडणारा थरार यामुळे ही दहीहंडी महाराष्ट्रातील इतर सर्व उत्सवांपेक्षा वेगळी ठरते.


Comments
Add Comment

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात उकाडा वाढणार, गुलाबी थंडीसाठी आणखी प्रतीक्षा; कोकणासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज

INDW vs ZIMW: भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेला दिला क्लिन स्विप, तिसऱ्या टी20 सामन्यात 92 धावांनी नमवलं

स्मृती मंधानाच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेला 3-0 ने पराभूत केलं. स्मृती मंधानाने नेतृत्व हाती

मनोज जरांगेंच्या संपत्तीची चौकशी करा! रामदास कदमांची मागणी

मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी नारायणगड येथील दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडचे बाधित क्षेत्र ४० हजार चौरस मीटरने वाढले, विकास नियोजन रस्ता आणि कोस्टल रोडची रुंदी वाढवणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई कोस्टल रोड उत्तरचे बांधकाम केले जात असून या प्रकल्प कामांसाठी वर्सोवा ते गोरेगाव

"जळजळ, मळमळ... कोणी पुढे गेला की... " उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर बोचरी टीका

मुंबई: दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.

मोगरा नाल्यावरील पंपिंग स्टेशन अडकले, आता कोस्टल रोडसाठी होणार त्याच जमिनीचे संपादन

मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या मोगरा नाल्याच्या बांधकामाला जमिन मालकाने आक्षेप घेत