Sachin Tendulkar : ‘माझ्यावर विश्वास ठेवणारी पहिली व्यक्ती माझे वडील आहेत’ - सचिन तेंडुलकर

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या कामगिरीने कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शिक्षक दिनानिमित्त आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘द फर्स्ट पर्सन टू बिलीव्ह इन यू’ या लेखातून सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला वडिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि त्यांच्या शिकवणीबद्दल सांगितले आहे. (Sachin Tendulkar)


सचिनने सांगितले की, त्याच्या प्रवासाची सुरुवात क्रिकेटच्या मैदानापासून किंवा प्रशिक्षकापासून नव्हे, तर घरापासून झाली. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे लेखक, कवी आणि प्राध्यापक होते. मात्र, सचिन यांच्या आयुष्यात ते एक मार्गदर्शक आणि मेंटर म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावत होते. लहानपणी सचिनला क्रिकेटची असलेली आवड त्याच्या वडिलांनी ओळखली. मात्र, त्यांनी सचिनने भविष्यात नेमकं काय बनावं, हे ठरवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याऐवजी क्रिकेटचा पाठपुरावा करण्यासाठी त्याला स्वातंत्र्य आणि आवश्यक पाठिंबा दिला. (Sachin Tendulkar)



‘अपयश चालेल, पण फसवणूक नाही’


सचिनच्या वडिलांनी त्याला दिलेली एक शिकवण आजही त्याच्या मनात कायम आहे. अपयश आले तरी चालेल, पण फसवणूक कधीही करू नका आणि यशासाठी शॉर्टकट घेऊ नका, असा संदेश त्यांनी सचिनला दिला होता. सचिनच्या मते, चांगला शिक्षक किंवा मार्गदर्शक तोच असतो, जो एखाद्या व्यक्तीमध्ये असलेली क्षमता त्याला स्वतःला जाणवण्याआधीच ओळखतो. (Sachin Tendulkar)



याच विचारातून फाउंडेशनची स्थापना


भारतात अनेक मुलांमध्ये मोठी क्षमता आहे. मात्र, त्यांना योग्य प्रशिक्षक, मार्गदर्शक, शिक्षणाचे वातावरण किंवा मूलभूत आरोग्यसेवा मिळत नसल्याने त्यांना आपली क्षमता ओळखण्याची संधी मिळत नाही. याच विचारातून सचिन आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी 'सचिन तेंडुलकर फाउंडेशन' सुरू केल्याचे त्याने लेखात नमूद केलं आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांना क्रीडा, आरोग्य आणि शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.



वडिलांच्या स्मरणार्थ नवी फेलोशिप


यंदाच्या शिक्षक दिनानिमित्त सचिन तेंडुलकर फाउंडेशनने ‘Professor Ramesh Tendulkar Memorial Fellowship’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही फेलोशिप फाउंडेशनच्या दीर्घकालीन आरोग्य भागीदार इंगा हेल्थ फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. दरवर्षी एका MD डॉक्टरला श्रीनगरमध्ये Cleft आणि Craniofacial Care क्षेत्रात एका वर्षासाठी विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित डॉक्टरला सचिन तेंडुलकर फाउंडेशनकडून प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. (Sachin Tendulkar)


सचिनने सांगितले की, ही फेलोशिप केवळ वडिलांच्या स्मृतींना वाहिलेली आदरांजली नाही, तर यातून ‘शिक्षण संधी निर्माण केल्या जातात आणि त्या संधीचा उपयोग इतरांच्या सेवेसाठी झाला, तरच त्याला खरा अर्थ प्राप्त होतो,’ या त्यांच्या वडिलांच्या विचारांना पुढे नेण्याचा एक प्रयत्न आहे.

Comments
Add Comment

Skin Care : बीटाच्या फेसपॅकनं त्वचेला मिळेल पोषण, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक; घरीच बनवा हे फेसपॅक

बीटा मध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे त्वचेला आतून पोषण

Jalgaon : जळगावच्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप ! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Jalgaon : जळगावच्या पारोळा (Parola) तालुक्यातील कोळपिंप्री गावावर शुक्रवारी शोककळा पसरली. भारतीय सैन्य दलातील 1 पॅरा

John Ternus : ॲपलच्या नव्या CEOचं लिंक्डइन प्रोफाइल चर्चेत; CEO झाल्यानंतरही पद अपडेट केलंच नाही

मुंबई : ॲपलचे नवे CEO जॉन टर्नस (John Ternus) सध्या त्यांच्या कामामुळे नव्हे, तर लिंक्डइन प्रोफाइलमुळे चर्चेत आले आहेत.

Hanuman Ansh Movie : पाचव्या आठवड्यातही ‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच

मुंबई : कोणताही बॉलिवूड सुपरस्टार नसतानाही ‘हनुमान अंश’ (Hanuman Ansh Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत

मनोरंजन विश्वात खळबळ ! प्रसिद्ध गायकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह ; हत्येचा संशय, तपास सुरू

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायकाचा कुजलेल्या अवस्थेत घरातच मृतदेह

Suraj Chavan : ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाण झाला बाबा, जन्माष्टमीच्या मुहूर्तावर बाळाचं आगमन, बाळाचा पहिला Photo समोर

Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता आणि ‘गुलीगत किंग’ म्हणून लोकप्रिय झालेला सूरज