पुणे : पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढताना भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत लोखंडी स्ट्रक्चरचा अवजड ...
९ व्या थरावरून थेट
9 थरांचा मनोरा उभारल्यानंतर पथकातील गोविंदा खाली उतरत होते. त्याचवेळी 9व्या थरावर असलेला एक गोविंदा अचानक खाली कोसळला. या घटनेमुळे काही क्षणांसाठी उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. (Ghatkopar DahiHandi)
घटनेचा व्हिडिओ व्हायरल
गोविंदा खाली पडताच इतर सदस्यांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. दहीहंडीच्या उत्साहात मानवी मनोरे उभारताना गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान, घाटकोपरमधील गणेश चुक्कल यांच्या दहीहंडी उत्सवात दरवर्षी मोठ्या संख्येने गोविंदा पथके सहभागी होत असतात. गेल्या वर्षी याच ठिकाणी जय जवान गोविंदा पथकाने 10 थरांची कामगिरी केली होती. ( DahiHandi 2026)