DahiHandi 2026 : दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट; थरावरून कोसळल्याने नवी मुंबईत गोविंदाचा बळी


नवी मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना मुंबई आणि नवी मुंबईतून दोन अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. थरावरून कोसळल्यामुळे आणि अपघातामुळे दोन गोविंदांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात एका 34 वर्षीय तरुणासह एका 7 वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पहिली घटना नवी मुंबईतील घणसोली भागात घडली. देविदास सौगुळे दहीहंडी मंडळाच्या कार्यक्रमात मानवी मनोरे रचत असताना अचानक थर कोसळले. या दुर्घटनेत घणसोली गाव कोळीवाडा येथे राहणारे स्वप्निल सदानंद नावर हे 34 वर्षीय गोविंदा गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.





मुंबईत ७ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू



दुसरी घटना मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील मालवणी येथे घडली. एकता वेल्फेअर सोसायटी परिसरात स्थानिक लहान मुले स्वतःहून दहीहंडी साजरी करत होती. दहीहंडी बांधण्यासाठी दोरी एका झाडाला आणि तळमजल्यावरील विटांच्या खांबाला बांधण्यात आली होती. हंडी फोडण्याच्या प्रयत्नात दोरीचा ताण आल्याने विटांचा खांब अचानक कोसळला. हा खांब 7 वर्षांच्या रुद्र कदम या चिमुरड्याच्या थेट डोक्यावर पडला. गंभीर जखमी झालेल्या रुद्रला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सणाचा उत्साह सुरू असताना घडलेल्या या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.










Comments
Add Comment

France Protest : आंदोलनाच्या आगीत ऐतिहासिक वास्तू भस्मसात; फ्रेंच नागरिकांमधून तीव्र संताप आणि दुःख

 France Protest :  फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि लुटमार सुरू आहे. पॅरिससह दहा शहरांमध्ये हिंसाचार

Nashik : त्र्यंबकेश्वर येथे अति महत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी अति महत्वाच्या व्यक्ती येणार आहेत.

SBI Cyber Attack : ग्राहकांनो सावध राहा! SBI च्या सिस्टीमवर सायबर हल्ला; हजारो खातेदारांची माहिती लीक झाल्याचा दावा

SBI Cyber Attack: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वर सायबर हल्ला झाल्याचा आणि ग्राहकांची वैयक्तिक माहिती उघड झाल्याचा दावा करण्यात

Nashik : कुशावर्त परिसरातील ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला अधिक गती द्यावी, आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून पूर्वतयारीची पाहणी

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ परिसरात सुरू

Nashik : दसऱ्याच्या मुहूर्तावर नाशिककरांची घरखरेदीला पसंती ! रिअल इस्टेटमध्ये १२५ कोटींहून अधिक उलाढाल

Nashik : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नाशिककरांनी गृहखरेदीचा मुहूर्त साधत रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा बूस्ट दिला.

कर वाचवण्यासाठी परराज्यात वाहन नोंदणी? महाराष्ट्रात ४७५ वाहनांवर कारवाई!

राज्यात वापरली जाणारी परंतु कर चुकवण्यासाठी महाराष्ट्राबाहेर नोंदणी केलेली वाहने उघडकीस आणण्याच्या