मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सोशल मीडियावर एक मेसेज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये योजनेची नवीन नोंदणी आणि e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे समोर आले आहे. महिला व बालविकास विभागाने नव्याने नोंदणी किंवा e-KYC सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Ladki Bahin Yojana)
व्हायरल मेसेजमध्ये काय दावा?
सोशल मीडियावरील या मेसेजमध्ये e-KYC राहिलेल्या किंवा हप्ते बंद झालेल्या महिलांनी पुन्हा अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी एका अनधिकृत लिंकवर क्लिक करून नवीन फॉर्म भरण्यास सांगितले जात आहे. या प्रक्रियेसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र, बँक खात्याची माहिती आणि फोटो यांसारखी वैयक्तिक कागदपत्रे मागितली जात आहेत. (Ladki Bahin Yojana)
पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ( Ketan Agrawal Murder) पोलीस तपासादरम्यान एक मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि ...
सरकारकडून कोणतीही नवीन घोषणा नाही
महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी किंवा e-KYC पुन्हा सुरू करण्याबाबत सध्या कोणताही सरकारी निर्णय झालेला नाही. तसेच यासंदर्भात मंत्री आदिती तटकरे किंवा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये. (Ladki Bahin Yojana)
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक उपळी बुर्जावरून तीन मुलांसह दरीत उडी मारलेल्या राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ आत्महत्या (Wrestler ...
अनधिकृत लिंकपासून सावध राहा
व्हायरल लिंकवर क्लिक करून आधार क्रमांक, बँक खाते किंवा इतर वैयक्तिक माहिती शेअर केल्यास सायबर फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महिलांनी कोणतीही माहिती अनोळखी किंवा अनधिकृत लिंकवर भरू नये. योजनेशी संबंधित अधिकृत माहितीसाठी केवळ महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. सरकारी माहितीनुसार या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा DBT लाभ दिला जातो. (Ladki Bahin Yojana)