Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेने कोकणासाठी ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव दरम्यान ४ आरक्षित विशेष गाड्या आणि पनवेल ते चिपळूण दरम्यान ३० अनारक्षित मेमू सेवांचा समावेश आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड्या (४ सेवा)
गाडी क्रमांक 01003 विशेष गाडी: दिनांक १६.०९.२०२६ आणि १९.०९.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०७.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २३.४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. (२ सेवा)
गाडी क्रमांक 01004 विशेष गाडी: दिनांक १५.०९.२०२६ आणि १८.०९.२०२६ रोजी मडगाव येथून सायंकाळी १६.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (२ सेवा)
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.
गाडीची संरचना: ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ८ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
नागपूर : शासनाच्या विविध विभागांच्या माहितीची सुरक्षितता, उपलब्धता आणि विश्वासार्हता सांभाळण्यासाठी नागपूर येथील आपत्ती पुनर्प्राप्ती डेटा सेंटर ...
पनवेल - चिपळूण - पनवेल मेमू अनारक्षित विशेष गाड्या (३० सेवा)
गाडी क्रमांक 01159 मेमू अनारक्षित विशेष गाडी: दिनांक १०.०९.२०२६ ते १४.०९.२०२६ आणि १८.०९.२०२६ ते २७.०९.२०२६ या कालावधीत पनवेल येथून दुपारी १५.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२.२० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. (१५ सेवा)
गाडी क्रमांक 01160 मेमू अनारक्षित विशेष गाडी: दिनांक १०.०९.२०२६ ते १४.०९.२०२६ आणि १८.०९.२०२६ ते २७.०९.२०२६ या कालावधीत चिपळूण येथून सकाळी ०९.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल. (१५ सेवा)
महत्त्वाची नोंद: वरील मेमू सेवा दिनांक १५.०९.२०२६ ते १७.०९.२०२६ या कालावधीत चालवल्या जाणार नाहीत.
थांबे (पनवेल ते चिपळूण): पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनि.
संरचना: ०८ डब्यांची मेमू रॅक.
तिकीट आरक्षण आणि बुकिंग माहिती
आरक्षित गाड्यांचे बुकिंग: गाडी क्रमांक 01003 साठीचे आरक्षण दिनांक ०८.०९.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होईल.
अनारक्षित प्रवास: सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांचे बुकिंग 'युटीएस' (UTS) प्रणालीद्वारे करता येईल. तसेच प्रवासी तिकीट बुकिंगसाठी 'रेलवन' (RailOne) ॲप देखील डाउनलोड करू शकतात.
वेळापत्रक माहिती: या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीइएस (NTES) ॲप डाउनलोड करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.