Indonesia Volcano Eruption : इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; जकार्तासह अनेक भाग राखेच्या विळख्यात, विमानसेवा तात्पुरती स्थगित

जकार्ता : इंडोनेशियाच्या सुंडा सामुद्रधुनीत स्थित ‘अनाक क्राकाटोआ’ ज्वालामुखीचा रविवारी पहाटे अचानक उद्रेक झाला. या उद्रेकामुळे आकाशात तब्बल ५०,००० फूट उंचीपर्यंत राखेचे प्रचंड ढग पसरले. ज्वालामुखीतून बाहेर पडलेली राख इंडोनेशियाची राजधानी जकार्तासह आसपासच्या भागात पसरल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सोकार्नो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.




इंडोनेशियाच्या भूवैज्ञानिक संस्थेच्या माहितीनुसार, जावा आणि सुमात्रा या प्रमुख बेटांदरम्यान असलेल्या सुंडा सामुद्रधुनीतील या ज्वालामुखीय बेटावर शनिवारी हालचालींची चिन्हे दिसून आली होती. त्यानंतर रविवारी पहाटे ३ वाजून ५३ मिनिटांनी सुमारे ३० सेकंदांचा ज्वालामुखी उद्रेक झाला. या घटनेत सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, परिस्थिती लक्षात घेता आसपासच्या रहिवाशांना आणि पर्यटकांना सक्रिय ज्वालामुखीच्या क्रेटरपासून किमान ३ किलोमीटर अंतरावर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विमानतळ प्रशासनाने रविवारी पहाटे जारी केलेल्या प्रवासी सूचनेनुसार, माउंट अनाक क्राकाटाऊ येथे ज्वालामुखीचा उद्रेक आणि हालचाली वाढल्याने सोकार्नो-हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा सकाळी ५.३० ते ९.३० या वेळेत तात्पुरती बंद ठेवण्यात आली. देशातील या सर्वाधिक व्यस्त विमानतळावर रद्द करण्यात आलेल्या विमानांची संख्या वाढत गेल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक प्रवाशांनी तिकीटाचा परतावा मागण्यास सुरुवात केली तसेच चेक-इन केलेले सामानही परत घेतले.




इंडोनेशियाची ज्वालामुखी विज्ञान संस्था आणि ऑस्ट्रेलियातील डार्विन व्होल्कॅनिक अॅश अॅडव्हायजरी सेंटरने उपग्रह प्रतिमांच्या माध्यमातून ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेचे दोन मोठे ढग ओळखले आहेत. त्यापैकी राखेचा एक ढग २०,००० फूट उंचीपर्यंत पोहोचला आणि ईशान्य दिशेने सरकला. त्यामुळे राजधानी जकार्ता, बँटेन, पश्चिम जावा तसेच आसपासच्या समुद्री भागांवर परिणाम झाला.

दरम्यान, राखेचा दुसरा ढग तब्बल ५०,००० फूट उंचीपर्यंत पोहोचला असून तो पश्चिम आणि वायव्य दिशेने सरकत आहे. त्यामुळे बँटेन, लॅम्पुंग आणि बेंकुलू प्रांतांसह दक्षिण सुंडा सामुद्रधुनी आणि सुमात्राच्या पश्चिमेकडील हिंदी महासागराचा मोठा भाग राखेने प्रभावित झाला आहे. २०१८ मध्येही अनाक क्राकाटोआ येथे भीषण ज्वालामुखी उद्रेक झाला होता. त्यानंतर झालेल्या भूस्खलनामुळे विनाशकारी सुनामी निर्माण झाली होती. या सुनामीत सुमात्रा आणि जावा बेटांवर किमान ४३० जणांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

Bolivia Military Base Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

बोलिव्हियामध्ये लष्करी तळावर झालेल्या भीषण स्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राजधानी ला पाझपासून सुमारे ३०

Nepal Flood : मृत्यूवर मात! नेपाळमधील महापुरातून १० दिवसांनी परदेशी नागरिकासह दोघांना सुरक्षित बाहेर काढले

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण महापुरानंतर १० दिवसांनी एक अत्यंत दिलासादायक बातमी

Nepal Floods News : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १३०० हून अधिक बळी; बचावकार्यासाठी सैन्याकडून ताडी नदीवर 'रोप ब्रिज'ची उभारणी

नुवाकोट : नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापूर आणि ढगफुटीमुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत

Indian entrepreneurs in USA : अमेरिकेत भारतीय उद्योजक अमेरिकन तरुणांना देणार प्रशिक्षण; ‘फाउंड्री स्कूल’चा शुभारंभ

वॉशिंग्टन : अमेरिकेने देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘फाउंड्री स्कूल’ या नव्या प्रशिक्षण

Mohan Bhagwat Britain Visit : सरसंघचालकांच्या ब्रिटन दौऱ्यात ‘लोकसंवादा’वर भर

लंडन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 2 ते 7 सप्टेंबरदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. संघाचे

Nepal Car Accident : नेपाळमध्ये फेवा तलावात कार कोसळून अपघात; दोन भारतीयांचा मृत्यू, दोघे जखमी

पोखरा : नेपाळमधील पोखरा येथे शुक्रवारी पहाटे एक कार फेवा तलावात कोसळल्याने अपघात घडला. या अपघातात दोन भारतीय