Palghar Hospital Dispute : पालघरमध्ये जखमी गोविंदांच्या उपचारावरून रुग्णालयात गोंधळ; शिवसेना जिल्हाप्रमुखांसह 17 जणांवर तक्रार दाखल


पालघर : पालघरमध्ये दहीहंडी (DahiHandi) उत्सवा दरम्यान जखमी झालेल्या गोविंदांच्या उपचारावरून रुग्णालयात मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. उपचाराच्या बिलावरून आणि सीटी स्कॅनच्या तपासणीवरून शिवसैनिकांनी डॉक्टरांशी वाद घालत रुग्णालयात गोंधळ घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहरप्रमुख राहुल घरत आणि आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांच्यासह 17 जणांविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ( Palghar News)





मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमध्ये आयोजित दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान झालेली 19 हजार 866 रुपयांची बिलं भरण्यावरून वाद सुरू झाला. आयोजकांकडून 10 हजार रुपये भरण्यात आले होते. मात्र मध्यरात्री शिवसैनिकांनी (Shivsena) रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना जाब विचारला आणि सीटी स्कॅन करण्यावर आक्षेप घेतला. डॉक्टरांनी वैद्यकीय कारणास्तव ही तपासणी आवश्यक असल्याचे सांगितले, परंतु वाद वाढल्याने रुग्णालयाला धमकी देण्यात आली. ( Palghar Hospital Dispute)

याच वादादरम्यान शहरप्रमुख राहुल घरत यांनी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात मारल्याचा आरोप आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र वैद्यकीय सेवा अधिनियमातील विविध कलमांखाली तक्रार नोंदवून घेतली आहे. दरम्यान, किरकोळ जखमी रुग्णांना डिस्चार्ज देण्यास उशीर होत असल्याने आणि विचारणा करताना केवळ किरकोळ वाद झाल्याचा दावा जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी केला आहे. ( Shiv Sena Palghar)



Comments
Add Comment

Pratap Sarnaik : सरनाईकांच्या कानपिचक्यांनी... एसटीची गाडी रुळावर; ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ

प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढविण्याचा सकारात्मक परिणाम मुंबई : एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी

Suraj Chavan : कृष्णाच्या जन्मदिनी सूरजच्या घरी ‘राधा’ जन्मली; बाबा होणं ही भावना शब्दात व्यक्त करता येत नाही...

मुंबई : बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण आणि त्याची पत्नी संजना चव्हाण यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन

Delhi Building Collapse : दिल्लीच्या सत्य निकेतनमध्ये तीन मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी एक तीन मजली इमारत अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. या

Fake Doctor Fraud : बनावट डॉक्टरने ७० हजारांना गंडा घातला; पैसे परत मिळवण्याच्या नादात निवृत्त शिक्षिकेचे लाखोंचे नुकसान

मुंबई : बनावट डॉक्टर असल्याचे भासवून एका ७० वर्षीय निवृत्त शिक्षिकेची ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. विशेष

Indonesia Volcano Eruption : इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; जकार्तासह अनेक भाग राखेच्या विळख्यात, विमानसेवा तात्पुरती स्थगित

जकार्ता : इंडोनेशियाच्या सुंडा सामुद्रधुनीत स्थित ‘अनाक क्राकाटोआ’ ज्वालामुखीचा रविवारी पहाटे अचानक उद्रेक

IIT Admission Scam : IITमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली १६.५ लाखांची फसवणूक; बनावट SIM पुरवणाऱ्या रॅकेटचा पवई पोलिसांकडून पर्दाफाश

मुंबई : बनावट इंजिनिअरिंग अ‍ॅडमिशनच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीला अनधिकृतपणे सक्रिय केलेले SIM कार्ड