Building collapse CCTV Fottage : ५ सेकंद अन् ५ मजली इमारत जमीनदोस्त! ६ जणांचा मृत्यू, थरारक CCTV फुटेज आले समोर

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सत्य निकेतन भागात रविवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक दुर्घटना घडली. मुलांचे पेइंग गेस्ट (PG) नसलेली एक ५ मजली इमारत अवघ्या काही सेकंदांत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून, ११ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. इमारत कोसळतानाचा अंगावर काटा आणणारा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



CCTV मध्ये कैद झाला थरार; सुदैवाने दुकानदार थोडक्यात वाचला




रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात हा संपूर्ण थरार स्पष्ट कैद झाला आहे. घटनेच्या काही क्षण आधी एक दुकानदार आपल्या दुकानाबाहेर शांतपणे बसलेला दिसतो. अचानक संपूर्ण इमारत कोसळते आणि काही सेकंदांतच सर्वत्र धूळ आणि ढिगाऱ्याचे साम्राज्य पसरते. इमारत पडताना पाहताच तो दुकानदार जीवाच्या आकांताने पळ काढतो आणि सुदैवाने थोडक्यात वाचतो. आसपासचे लोक आणि इतर दुकानदार जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.



अवैध बांधकाम अन् नूतनीकरण: अपघाताची मुख्य कारणे



ही दुर्घटना रविवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताच्या वेळी इमारतीच्या तळमजल्यावर नूतनीकरणाचे (Renovation) काम सुरू होते. तसेच गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे इमारतीच्या तळघरात (Basement) पाणी साचले होते, ज्यामुळे इमारतीचा पाया कमकुवत झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. महापालिकेच्या (MCD) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत ५० वर्षे जुनी होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या जागेवर फक्त २ मजले (G+1) बांधण्याची परवानगी होती, परंतु नियमांचे उल्लंघन करून तिथे ५ मजले (G+4) उभारण्यात आले होते.



युद्धाच्या पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन; ढिगाऱ्याखाली सोडले ऑक्सिजन सिलिंडर




घटनेची माहिती मिळताच NDRF च्या दोन तुकड्या (सुमारे ७० जवान), श्वान पथक, अग्निशामक दल आणि दिल्ली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना श्वास घेण्यास अडचण येऊ नये म्हणून आत ऑक्सिजन सिलिंडर सोडण्यात आले. स्थानिक रहिवाशांनीदेखील स्वतःच्या हातांनी आणि मिळेल त्या साहित्याने ढिगारा उपसण्यास मदत केली. जखमींवर सध्या AIIMS ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.



इमारत मालकावर FIR दाखल; दंडाधिकारी चौकशीचे आदेश


दक्षिण-पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त (DCP) सुरेंदर चौधरी यांनी ६ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी इमारतीचा मालक 'हरिराम' आणि इतरांविरोधात निष्काळजीपणा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दुर्घटनास्थळाला भेट देऊन या प्रकरणाच्या दंडाधिकारी चौकशीचे (Magisterial Inquiry) आदेश दिले आहेत. सत्य निकेतन हा परिसर व्यंकटेश्‍वरा आणि मोतीलाल नेहरू कॉलेजजवळ असल्याने इथे मोठ्या संख्येने परप्रांतीय विद्यार्थी राहतात.

Comments
Add Comment

Dharavi LPG cylinder blast : धारावीत एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट; २ लहान मुलांसह ५ जण गंभीर जखमी, गॅस मेकॅनिकच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना ?

मुंबई : मुंबईतील धारावी (Mumbai Dharavi News)  परिसरात एका घरात एलपीजी गॅस सिलिंडरचा अचानक भीषण स्फोट (LPG cylinder blast) झाल्याची

Delhi building collapse : दिल्लीतील सत्य निकेतन दुर्घटनेप्रकरणी हायकोर्टात याचिका; मुख्यमंत्री रेखा गुप्तांकडून घटनास्थळाची पाहणी

नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन भागात ५ मजली इमारत कोसळून झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

Delhi Building Collapse : दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, बचावकार्य युद्धपातळीवर

दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात एक पाच मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या

C. P. Radhakrishnan : तरुणांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावे; उपराष्ट्रपतींचे विद्यार्थ्यांना आवाहन

गुवाहाटी : भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी तरुण पिढीला अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आणि

ISRO Privatization : इस्रोमध्ये मोठा बदल? ९ कर्मचारी संघटना एकवटल्या; खासगीकरणावर मागितली ‘लिखित स्पष्टता’

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांचा सहभाग वाढत असताना, ISROच्या नऊ कर्मचारी संघटनांनी

Delhi Building Collapse updated :दिल्लीच्या सत्य निकेतनमध्ये इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, विद्यार्थ्यांसह अनेक जण अडकल्याची भीती

नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी एक बहुमजली इमारत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या