पालघर : पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्टला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि आमदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांच्यासह 17 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. आता या संपूर्ण प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. ज्या जखमी गोविंदावर उपचारावरून हा वाद निर्माण झाला होता, त्याच गोविंदाने आता रुग्णालयातील डॉक्टरांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. (Palghar)
Pune Crime : पुण्यात मध्यरात्री थरार! ४ ते ५ जणांनी घेरलं अन्...; सातारा महामार्गावर भयंकर हत्याकांड
पुणे : पुणे-सातारा महामार्गाजवळ भोर तालुक्यात रविवारी पहाटेच्या सुमारास हत्येची एक थरारक घटना घडली आहे. ४ ते ५ जणांच्या टोळक्याने एका २८ वर्षीय ...
जखमी गोविंदाची थेट डॉक्टरांविरोधात तक्रार
जखमी गोविंदाने आपल्या तक्रारीत रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला केवळ किरकोळ दुखापत झाली असतानाही डॉक्टरांनी जाणीवपूर्वक आयसीयूमध्ये ठेवले आणि वारंवार विनंती करूनही डिस्चार्ज दिला नाही, असा दावा गोविंदाने केला आहे. गरज नसताना उपचाराचा खर्च वाढवण्यासाठी आणि अडकवून ठेवण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. (Palghar News)
या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापले आहे. पालघरचे आमदार राजेंद्र गावित, शिवसेना पदाधिकारी आणि गोविंदा पथकाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पालघर पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. डॉक्टरांवर तत्काळ गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार गावित यांनी दिला आहे. ( Govinda Victim Complaint)
शिवसेना नेत्यावर गुन्हा दाखल
आधी रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे शिवसेना नेत्यांवर गुन्हा दाखल झाला होता, तर आता जखमी गोविंदाने थेट डॉक्टरांवरच आरोप केल्यामुळे पालघरमधील हे प्रकरण अधिक चिघळले आहे. या प्रकरणी पोलीस आता नेमकी काय भूमिका घेतात आणि काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ( Maharashtra News Update)





