Monday, September 7, 2026

Pune Crime News : पैसे परत देण्याच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; पुण्यात धक्कादायक प्रकार

Pune Crime News : पैसे परत देण्याच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; पुण्यात धक्कादायक प्रकार
पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच सहकारनगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हातउसने घेतलेले पैसे परत देण्याचा बहाणा करून एका तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पीडित तरुणीने प्रसंगावधान दाखवत विरोध केल्यामुळे आरोपीचा प्लॅन फसला आणि तरुणीची सुटका झाली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नीलेश वाझे असे 39 वर्षीय आरोपीचे नाव असून तो धनकवडी परिसरातील रहिवासी आहे. आरोपीची पीडित तरुणीसोबत आधीपासून ओळख होती. आरोपीने तरुणीकडून 20 हजार रुपये हातउसने घेतले होते. हे पैसे परत देतो असे सांगून आरोपीने तरुणीला भेटण्यासाठी बोलावले. आपले पैसे परत मिळणार असल्यामुळे तरुणी त्याला भेटण्यासाठी तयार झाली.

कोल्ड ड्रिंक देऊन तरुणीवर

4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी आरोपी तरुणीला दुचाकीवरून घेऊन निघाला. वाटेत त्याने तरुणीला एक कोल्ड ड्रिंक पिण्यासाठी दिले. या ड्रिंकमध्ये त्याने आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर तरुणीला चक्कर येऊ लागली. आरोपी तिला एका निर्जन स्थळी घेऊन गेला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागला.

प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

तरुणीला या प्रकाराची जाणीव होताच तिने घाबरून न जाता आरोपीला जोरदार विरोध केला. तिने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि तातडीने एक कॅब बुक करून घर गाठले. घरी पोहोचल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सूत्रे हलवली आणि आरोपी नीलेश वाझे याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >