नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पी. एन. पाटील यांनी रबाळे एमआयडीसी परिसरातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करण्यासोबतच सुसाईड नोट लिहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Police Suicide)
Ashwini Paul Suicide : धाराशिव येथील कुस्तीपटू अश्विनी पौळ आत्महत्या प्रकरण; उपचारादरम्यान दुसऱ्या चिमुकलीचाही मृत्यू, आत्महत्येतील चौघांचाही अंत
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक उपळी बुर्जावरून तीन मुलांसह दरीत उडी मारलेल्या राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ आत्महत्या (Wrestler ...
आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ आला समोर
व्हिडिओमध्ये पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी तत्कालीन डीसीपी संजयकुमार पाटील, वायरलेस एसीपी गिरीश ठाकरे आणि स्थापना विभागातील हेड क्लर्क जयु अहिरे यांना आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे. त्यांनी 1 ते 8 पानांची सविस्तर सुसाईड नोट लिहिल्याचा दावाही या व्हिडिओमध्ये केला आहे. ( Navi mumbai news)
घटनेचा पुढील तपास सुरु
पाटील यांनी न्यायालय आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे या प्रकरणी न्यायाची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सध्या पोलीस सुसाईड नोट, व्हिडिओ आणि इतर पुराव्यांची सखोल तपासणी करत असून, या गंभीर आरोपांनंतर कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ( ASI PN Patil Suicide)
