Caste Validity Certificate : जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना तीन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. (Caste Validity Certificate)


सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी), इतर मागासवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, अशा उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करताना येणाऱ्या अडचणींची शासनाने दखल घेतली आहे. (Caste Validity Certificate)



त्यानुसार, ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या परिपत्रकाच्या दिनांकापासून पुढील तीन महिन्यांची मुदत संबंधित उमेदवारांना देण्यात आली आहे. या कालावधीत उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र संबंधित शैक्षणिक संस्थेकडे सादर करणे बंधनकारक राहणार आहे.



ही तीन महिन्यांची मुदत अंतिम मुदत असून, त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पुढील मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in⁠ उपलब्ध करून देण्यात आले आहे. संबंधित उमेदवार, शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांनी शासनाच्या निर्देशांची नोंद घेऊन विहित मुदतीत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Caste Validity Certificate)

Comments
Add Comment

Dattatray Bharne : भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

पुण्यात 'आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद-२०२६' चा दिमाखदार शुभारंभ पुणे : भारतीय डाळिंबाला जागतिक बाजारपेठेत उच्च

Nitin Gadkari : "नागपुरातील ९९% अंडरवर्ल्ड माझे समर्थक, पण..." केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खळबळजनक विधान

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) पल्या रोखठोक आणि थेट वक्तव्यांसाठी ओळखले

Pinky Tigress : ‘पिंकी’ची दहशत संपली! ४ बळी घेणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद

अमरावती : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या आणि चार जणांचा बळी घेतलेल्या नरभक्षक

Pandharpur News: पंढरीचा कायापालट होणार, पंढरपूर कॉरिडोरचा फर्स्ट लूक समोर

पंढरपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadanvis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडोरच्या (Pandharpur Corridor)

Nitesh Rane : आष्टी मतदारसंघाचा कायापालट! आष्टीतील फिश मार्केट उभारणीच्या प्रस्तावांना गती देण्याचे मंत्री नितेश राणेंचे आदेश!

मुंबई : बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा (Ashti Vidhansabha) मतदारसंघातील नगरपंचायत आणि ग्रामपंचायत स्तरावर आधुनिक फिश

Dadar BEST Driver : दादरच्या टिळक पुलाजवळ ट्रॅफिक जॅममधून वाट दिली नाही म्हणून BEST चालकाला मारहाण; व्हायरल व्हिडिओने खळबळ

मुंबई : मुंबईच्या दादरमधील टिळक पुलाजवळ रविवारी सायंकाळी एक संतापजनक घटना समोर आली आहे. रस्त्यावर ट्रॅफिक जाम