मुंबई: मुंबईमध्ये बस चालकाने कार चालकाला रस्ता न दिल्यामुळे मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली (Mumbai News). मुंबईच्या दादारमधील टिळक पुलाजवळची ही घटना असून बेस्ट प्रशासनाने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. रस्ता न दिल्यामुळे मागून येणाऱ्या संतप्त कार चालकाने बेस्टच्या कंत्राटी बस चालकाला मारहाण केली होती. नागरिकांनी मध्यस्थी करून बस चालकाची मारहाणीतून सुटका केली. त्यानंतर बेस्ट बस चालकाने दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन कार चालकाविरोधात तक्रार केली. त्याचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.
मुंबई : मुंबईच्या दादरमधील टिळक पुलाजवळ रविवारी सायंकाळी एक संतापजनक घटना समोर आली आहे. रस्त्यावर ट्रॅफिक जाम असताना बसला पुढे जाऊ देण्यावरून ...
बेस्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा आगाराची मातेश्वरी कंत्राट दाराची (BEST Bus) बस क्रमांक सी ४० वरील बस रविवारी प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडी बस स्थानकावरून दिंडोशी बस स्थानक कडे जात होती. ही बस दादर टिळक पुलाजवळ येताच बस चालकाने रस्ता न दिल्यामुळे मागून येणाऱ्या एका संतप्त कार चालकाने बसला ओव्हरटेक करून आपली कार भर रस्त्यात बससमोर थांबवली. (Road Traffic News)
बस चालकाला बस मध्ये चढून शिवीगाळ करत मारहाण केल्याचे कंत्राटी बेस्ट चालकाचे म्हणणे आहे. या मारहाणीनंतर कंत्राटी बस चालकाने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात जाऊन कार चालका विरोधात तक्रार केली आहे. दरम्यान, या कारवाई आणि तपासासाठी पोलिसांनी सोमवारी बस चालकाला अधिक चौकशीसाठी बोलविले होते. त्याचा तपास सुरू आहे.
मुंबई : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या 'लालबागच्या राजा'च्या (Lalbuagcha Raja) आगमनाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अवघ्या एका आठवड्यावर येऊन ...
घटना कशी घडली ?
रविवारी (६ सप्टेंबर) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दादरच्या व्यस्त टिळक पुलाजवळ प्रचंड ट्रॅफिक जाम असल्यामुळे बस तिथेच अडकली होती. यादरम्यान मागून येणार्या एका कार चालकाला बसने वाट दिली नाही, या कारणावरून कार चालक प्रचंड संतापला. त्याने आपली कार पुढे नेऊन थेट बसच्या समोर उभी केली आणि रागाच्या भरात बसमध्ये शिरून चालकाला जाब विचारत मारहाण केली. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, बस चालकाच्या आसनाजवळ तीन तरुण उभे आहेत. त्यातील एकाने चालकाला कानशिलात लगावली, तर दुसऱ्याने त्याला गंभीर धमक्या दिल्या. यावेळी बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती.
">चालकाला मारहाण सुरू असताना बसमधील एकाही प्रवाशाने त्याला वाचवण्यासाठी किंवा मध्यस्थी करण्यासाठी पुढे न येणे आश्चर्यकारक होते. बसचा कंडक्टर सुरुवातीला शांत उभा होता, पण नंतर त्याने त्या लोकांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर ते तिघेही जण बसमधून खाली उतरून निघून गेले. (Viral video)