Dadar BEST Driver : दादरच्या टिळक पुलाजवळ ट्रॅफिक जॅममधून वाट दिली नाही म्हणून BEST चालकाला मारहाण; व्हायरल व्हिडिओने खळबळ

मुंबई : मुंबईच्या दादरमधील टिळक पुलाजवळ रविवारी सायंकाळी एक संतापजनक घटना समोर आली आहे. रस्त्यावर ट्रॅफिक जाम असताना बसला पुढे जाऊ देण्यावरून झालेल्या वादातून एका कारचालकाने BEST बसच्या चालकाला कथितपणे मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Dadar Bus Driver)



नेमकी घटना कशी घडली ?


बेस्ट प्रशासनाला मिळालेल्या अहवालानुसार, ही घटना रविवारी (६ सप्टेंबर) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. वेट लीज (Wet Lease) अंतर्गत चालवली जाणारी बस क्रमांक ८२१५ (रूट C-40/33) ही शिवडी बस स्थानकातून दिंडोशीच्या दिशेने निघाली होती. बस वडाळा डेपोची होती. दादरच्या व्यस्त टिळक पुलाजवळ प्रचंड ट्रॅफिक जाम असल्यामुळे बस तिथेच अडकली होती. यादरम्यान मागून येणाऱ्या एका कारचालकाला बसने वाट दिली नाही, या कारणावरून कारचालक प्रचंड संतापला. त्याने आपली कार पुढे नेऊन थेट बसच्या समोर उभी केली आणि रागाच्या भरात बसमध्ये शिरून चालकाला जाब विचारत मारहाण केली.


व्हायरल व्हिडिओमधील धक्कादायक दृश्य


सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही क्लिप अंगावर काटा आणणारी आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, बस चालकाच्या आसनाजवळ तीन तरुण उभे आहेत. त्यातील एका व्यक्तीने चालकाला कानशिलात लगावली, तर दुसऱ्याने त्याला गंभीर धमक्या दिल्या. यावेळी बस प्रवाशांनी खसाखस भरलेली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चालकाला मारहाण सुरू असताना बसमधील एकाही प्रवाशाने त्याला वाचवण्यासाठी किंवा मध्यस्थी करण्यासाठी पुढे न येणे आश्चर्यकारक होते. बसचा कंडक्टर सुरुवातीला शांत उभा होता, पण नंतर त्याने त्या लोकांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर ते तिघेही जण बसमधून खाली उतरून निघून गेले. (Viral video)


चालकाची पोलिसांत तक्रार; आज होणार पुढील तपास


या धक्क्यातून सावरल्यानंतर पीडित BEST चालकाने थेट शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकारची अधिकृत तक्रार नोंदवली. चालकाच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्याला सोमवारी सकाळी १० वाजता पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावले आहे. पोलीस आता याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत असून, व्हायरल व्हिडिओच्या आधारे त्या अरेरावी करणाऱ्या कारचालक आणि त्याच्या सोबत्यांचा शोध घेतला जात आहे. (BEST Bus Driver Assault)

Comments
Add Comment

Ganeshotsav ST BUS: गणेशोत्सवात गावी जायचं तिकिट कन्फर्म झालं का? उपमुख्यमंत्र्यांनी केली मोफत बससेवेची घोषणा; वाचा सविस्तर

ठाणे: गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता चाकरमान्यांचे पाऊलं आपल्या गावी वळताना

BMC : महापालिकेची भरकटलेली दिशा

सचिन धानजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महापालिकेच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

KEM Hospital Mumbai : केईएम रुग्णालयात आता मेंदूविषयक आजारांचे झटक्यात निदान

एआय आणि न्यूरोसायन्सच्या सहाय्याने या आजारांचे अचूक निदान आणि विश्लेषण करण्यासाठी प्रयोगिक तत्वावर राबवणार

Municipal Schools : महापालिका शाळांमधील मुलांना आता संविधानिक मुल्यांचे शिक्षण

इयत्ता सहावीच्या मुलांसाठी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारीत पुस्तकांतील धडे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारतीय

Kanjurmarg Dumping Ground : कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडवर कचरा आणि दुर्गंधीवर ‘निरी’च्या उपाययोजना

सभोवतालच्या नागरी वस्तीतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करणार मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचा कांजूर मार्ग

Mumbai News : उत्तर मुंबईत सहा ठिकाणी कौशल्य विकास केंद्रांची उभारणी

स्थानिक पातळीवर कार्यरत ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्ग मुंबई महानगरपालिका आणि