Cyber Crime : ‘गॅस कनेक्शन अपडेट करा’चा मेसेज आला अन् खाते झाले रिकामे ! पुण्यात महिलेची ९.६६ लाखांची फसवणूक

Pune : पुण्यातील बिबवेवाडी याठिकाणी एक धक्कादायक सायबर गुन्हेगारीचा प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडीतील ५६ वर्षीय महिलेच्या मोबाईलवर एक मेसेज आला... ‘गॅस कनेक्शन अपडेट करा’. मेसेज पाहून महिलेने कोणताही संशय न घेता सांगितलेली प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, काही मिनिटांतच मोबाईलवर आलेल्या बँक अलर्ट्सनी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. काही समजण्याच्या आतच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ९ लाख ६६ हजार ३१५ रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले. या घटनेनंतर बिबवेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Cyber Crime )



‘गॅस कनेक्शन अपडेट’च्या नावाखाली जाळं


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या मेदनकर या ५६ वर्षीय महिलेच्या व्हॉट्सॲपवर अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. ‘एमएनजीएल गॅस कनेक्शन अपडेट करायचे आहे’, असे सांगत सायबर चोरट्याने त्यांना व्हॉट्सॲपवर APK फाइल पाठवली. गॅस सेवा बंद होईल, या भीतीपोटी महिलेने ती फाइल मोबाईलमध्ये डाउनलोड केली. याच प्रक्रियेचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेच्या मोबाईलमधील संवेदनशील माहिती मिळवली आणि मोबाईलचा अनधिकृत प्रवेश मिळवल्याचा आरोप आहे. (Pune Cyber Crime )



काही मिनिटांत खात्यातून ९.६६ लाख गायब


मोबाईलचा ताबा मिळवल्यानंतर सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या व्यवहारांच्या माध्यमातून महिलेच्या बँक खात्यातील तब्बल ९ लाख ६६ हजार ३१५ रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळवले. खात्यातून मोठी रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच महिलेने तातडीने बिबवेवाडी पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सूरज बेंद्रे या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Pune Cyber Crime )



APK फाइल म्हणजे सायबर चोरट्यांचा नवा सापळा ?


मोबाईल हॅक करून बँक खात्यातील पैसे लंपास करण्यासाठी सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या कारणांचा वापर केला जात आहे. गॅस कनेक्शन अपडेट, ई-चलान, वीजबिल अपडेट अशा कारणांचा आधार घेत नागरिकांना फसवण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे व्हॉट्सॲप किंवा मेसेजवर अनोळखी व्यक्तीने पाठवलेली APK फाइल कोणत्याही परिस्थितीत डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Pune Cyber Crime )



लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधान!


अनोळखी नंबरवरून आलेला मेसेज, लिंक किंवा फाइल उघडण्यापूर्वी त्याची सत्यता तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही सरकारी किंवा सेवा पुरवठादार संस्थेच्या नावाने मेसेज आला तरी त्यातील लिंकवर थेट क्लिक न करता संबंधित संस्थेच्या अधिकृत माध्यमातून माहितीची खात्री करून घ्यावी. एका चुकीच्या क्लिकमुळे लाखो रुपये गमावण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments
Add Comment

Ganeshotsav ST BUS: गणेशोत्सवात गावी जायचं तिकिट कन्फर्म झालं का? उपमुख्यमंत्र्यांनी केली मोफत बससेवेची घोषणा; वाचा सविस्तर

ठाणे: गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता चाकरमान्यांचे पाऊलं आपल्या गावी वळताना

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री थरार! ४ ते ५ जणांनी घेरलं अन्...; सातारा महामार्गावर भयंकर हत्याकांड

पुणे : पुणे-सातारा महामार्गाजवळ भोर तालुक्यात रविवारी पहाटेच्या सुमारास हत्येची एक थरारक घटना घडली आहे. ४ ते ५

Old Monk : 'ओल्ड मॉन्क' बाबत मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात आता ...

Old Monk : ‘ओल्ड मॉन्क’ रमच्या विक्रीवरून सुरू असलेल्या वादात मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) कंपनीला मोठा धक्का दिला

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मान्सून ओसरला, एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस गायब, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मुंबई : एल निनोच्या प्रभावामुळे ( El Nino Effect) महाराष्ट्रात मान्सूनचा जोर ओसरल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : आपत्ती पुनर्प्राप्ती डेटा सेंटरची कामे, निर्धारित कालावधीत पूर्ण करावी; मंत्री आशिष शेलार यांनी दिले निर्देश

नागपूर : शासनाच्या विविध विभागांच्या माहितीची सुरक्षितता, उपलब्धता आणि विश्वासार्हता सांभाळण्यासाठी नागपूर

Ganpati Special Trains 2026 : गणपतीसाठी गावी जाताय? मग रेल्वेची ही बातमी नक्की वाचा! कोकणात जाणाऱ्यांसाठी ३४ विशेष गाड्या

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अत्यंत