BEST Bus : मुंबईत दिव्यांगांच्या मोफत बेस्ट बस प्रवासावर ७.६४ कोटींचा खर्च

मागील आर्थिक वर्षातील अनुदानाची रक्कम बेस्टला महापालिका अदा करणार



मुबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील दृष्टीहीन आणि ४० टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना बेस्ट बसची सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाते. या मोफत प्रवास सवलती अंतर्गत बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन( बेस्ट )उपक्रमाला महापालिकेच्या वतीने ७.६४ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील आहे. ( Divyang Welfare)


सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जेंडर बजेट अंतर्गत्त उपलब्ध रु. ६.०० तरतूदीतून दृष्टीहीन व ४० टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना उपक्रमाने मोफत प्रवास सवलती अंतर्गत एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीतील एकूण ४ कोटी ३८लाख ०४ हजार ९८३ एवढ्या देयकाची रक्कम अनुदान म्हणून सप्टेंबर २०२५ मध्ये बेस्ट उपक्रमाला अदा करण्यात आली. तर आता बेस्ट उपक्रमाने दिव्यांग व्यक्तींना मोफत प्रवास सवलती अंतर्गत एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीसाठी एकूण ७ कोटी ६४ लाख ५५ हजार १७० एवढ्या रक्कमेचे अधिदान करण्याची मागणी केली आहे. ( Mumbai Update)



दिव्यांग व्यक्तींना परिवहन उपक्रमाने (बेस्ट) मोफत प्रवास सवलत देण्याकरीता ५.०० कोटी एवढ्या निधीची तरतूद उपलब्ध आहे. आता उर्वरित २ कोटी ६४ लाख ५५ हजार १७० रुपये एवढा निधी संचालक (नियोजन) विभागाच्या उपलब्ध करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील एकूण रु. ७. ६४ कोटी रुपयांची प्रतिपुर्ती स्वरुपात अनुदान सॅप प्रणालीतून विहित पध्दतीप्रमाणे बेस्ट उपक्रमास अदा करण्यात येईल. ( BEST Bus Service)


केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी समान संधी, संरक्षण व संपुर्ण सहभाग अधिनियम १९९५ मधील कलम ४० अनुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दिव्यांगांसाठी किमान ३ टक्के निधी राखीव ठेवण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेला ३ टक्के निधी खर्च करण्याच्या मार्गदर्शक सूचनेतील शिफारशी नुसार नागरी वाहतूक व्यवस्थेमध्ये दिव्यांगांकरीता सवलत देणे व त्याकरीता होणा-या खर्चाची भरपाई करण्यासाठी तरतूद करण्यात येते. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या संचालक (नियोजन) विभागाच्या वतीने यासाठी निधीची तरतूद करून दिव्यांगाना मोफत बस प्रवासाची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. ( Disability Welfare)

Comments
Add Comment

BMC : महापालिकेची भरकटलेली दिशा

सचिन धानजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील महापालिकेच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

KEM Hospital Mumbai : केईएम रुग्णालयात आता मेंदूविषयक आजारांचे झटक्यात निदान

एआय आणि न्यूरोसायन्सच्या सहाय्याने या आजारांचे अचूक निदान आणि विश्लेषण करण्यासाठी प्रयोगिक तत्वावर राबवणार

Municipal Schools : महापालिका शाळांमधील मुलांना आता संविधानिक मुल्यांचे शिक्षण

इयत्ता सहावीच्या मुलांसाठी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारीत पुस्तकांतील धडे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारतीय

Kanjurmarg Dumping Ground : कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडवर कचरा आणि दुर्गंधीवर ‘निरी’च्या उपाययोजना

सभोवतालच्या नागरी वस्तीतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करणार मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचा कांजूर मार्ग

Mumbai News : उत्तर मुंबईत सहा ठिकाणी कौशल्य विकास केंद्रांची उभारणी

स्थानिक पातळीवर कार्यरत ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण वर्ग मुंबई महानगरपालिका आणि

Dumping Road : गोवंडीतील साहीनाका डम्पिंग रोड येथील उद्यानाला 'टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने नाकारला

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता या नामकरणाच्या प्रस्तावाला विरोध मुंबई (विशेष प्रतिनिधी) : 'एम/पूर्व'