Sunday, September 6, 2026

Delhi Building Collapse : दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, बचावकार्य युद्धपातळीवर

Delhi Building Collapse : दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, बचावकार्य युद्धपातळीवर
दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात एक पाच मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना प्रकट केल्या आहेत. त्यांनी जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना केली असून घटनास्थळी मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू असल्याचे सांगितले आहे. (Delhi Building Collapse)
ही दुर्घटना रविवारी दुपारी घडली. ही इमारत विद्यार्थ्यांसाठी पेइंग गेस्ट म्हणजेच पीजी म्हणून वापरली जात होती. यात दिल्ली विद्यापीठातील अनेक विद्यार्थी राहत होते. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढून एम्स आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. (Satya Niketan Accident)
स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, इमारतीची अवस्था बऱ्याच काळापासून बिकट होती आणि तळघरात काही बांधकाम सुरू होते. बांधकामादरम्यान एका खांबाला तडा गेल्याने संपूर्ण इमारत कोसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाकडून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (PG Building Collapse)
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेमुळे दिल्ली विद्यापीठाच्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि अनधिकृत पीजी निवासस्थानांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. (NDRF Rescue Operation)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >