- 'एसओपी' निश्चितीसाठी आज बैठक; मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीच्या अध्यक्षांचा बहिष्कार
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच, अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) गणेशोत्सवातील महाप्रसाद आणि भंडाऱ्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरून राज्यभरातील गणेशोत्सव मंडळांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. महाप्रसादाच्या वाटपाबाबत आणि भंडाऱ्याच्या आयोजनासाठी स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) ठरवण्यासाठी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीवर मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने बहिष्कार टाकला आहे. उत्सवाच्या तोंडावर अशा प्रकारे अचानक नियमावली लादणे आणि सक्ती करणे चुकीचे असल्याचे सांगत समन्वय समितीने प्रशासनाच्या या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. (Ganeshotsav 2026)
अगरतळा : त्रिपुरातील वेस्ट त्रिपुरा (Tripura) जिल्ह्यातील सालबागान परिसरात एनसीसी (NCC) पोलीस आणि आसाम रायफल्स यांनी एका संयुक्त कारवाईत बिहारच्या दोन ...
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यभरात अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर धडक कारवाई सत्र सुरू आहे. हॉटेलचालकांपासून ते मोठ्या समारंभांपर्यंत सर्वच ठिकाणी एफडीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता सार्वजनिक गणेशोत्सवात वाटण्यात येणारा महाप्रसाद आणि विविध मंडळांतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या भंडाऱ्याच्या जेवणावरही एफडीएची बारीक नजर असणार आहे. कोणत्याही प्रकारचा भंडारा किंवा महाप्रसाद करण्यापूर्वी आणि आचारी बोलावण्यापूर्वी एफडीएची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अनुषंगाने एसओपी ठरवण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी ही बैठक बोलावली आहे. (Ganeshotsav 2026)
ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मच्छीमारांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची दिली माहिती ...
मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची भूमिका स्पष्ट केली. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस बाकी असताना मंडळांना बैठकीसाठी बोलावणे पूर्णपणे अयोग्य आहे. मंडळ बैठकीला जातील, पण मी स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला. ऐन वेळी महाप्रसादासाठी कंत्राटदार कुठे शोधायचे आणि अल्प मुदतीत परवानग्यांची प्रक्रिया कशी पूर्ण करायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी नमूद केले. (Ganeshotsav 2026)
- अमित ठाकरे यांना कन्यारत्न; ‘शिवतीर्थ’वर आनंदाचे वातावरण मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबात सोमवारी आनंदाचे ...
नियमांचे पालन करताना लवचिकता असावी आणि गणेशोत्सव मंडळांवर कोणतीही सक्ती लादू नये, अशी आग्रही भूमिका समन्वय समितीने घेतली आहे. या आधीच एफडीएला बैठक घेण्यासाठी पत्र दिले होते. कमी वेळात प्रसादासाठी कंत्राटदार नेमण्यापासून सर्व गोष्टी कशा करणार, याबाबत विचारणा केली होती. ऐन उत्सवाच्या काळात अशा प्रकारच्या नियमांमुळे मंडळांचे नियोजन कोलमडण्याची भीती आहे. प्रशासनाने यावर फेरविचार करून नियम सुटसुटीत न केल्यास येत्या काळात गणेश मंडळातून अधिक तीव्र विरोध दर्शविला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ganeshotsav 2026)






