ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मच्छीमारांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा
मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची दिली माहिती
मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची दिली माहिती
मुंबई : दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ कोस्टल रोडच्या दक्षिण वाहिनीवर (Southbound Stretch) अतिवेगाने आणि धोकादायकपणे कार चालवणाऱ्या ६ ते ७ चालकांविरोधात मरीन ...
मुंबई : मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांची आज ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज्यातील मत्स्य व्यवसाय, मच्छीमार बांधवांचे हित आणि बंदरांच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.(Silver Oak Meeting)
?feature=share
ससून डॉकच्या आधुनिकीकरणासाठी मत्स्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मंत्री नितेश राणे यांनी पवार यांना दिली. तसेच ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ची माहिती पुस्तिका भेट देऊन मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची माहितीही त्यांनी दिली.(Nitesh Rane Sharad Pawar Meeting)
मुंबई : पुढील काही महिन्यांत अनेक बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये ‘देवघर ऑन रेंट’ या वेगळ्या धाटणीच्या ...
महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला अधिक चालना देणे, मच्छीमार बांधवांच्या हितासाठी प्रभावी उपाययोजना करणे तसेच बंदरांच्या विकासाला गती देण्यासाठी शासनामार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाल्याचे नितेश राणे यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (Nitesh Rane Sharad Pawar Meeting)





