- एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावर अध्यक्ष विवेक भीमनवार यांची स्पष्टोक्ती; वस्तुस्थिती स्पष्ट करूनही वैयक्तिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पेपरफुटीच्या प्रकरणांवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्याविरोधात सातत्याने विनाकारण आणि अनुचित आरोप केले जात असून, औषध निरीक्षक परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटीची घटना ही आपण पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी घडली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. माझ्याविरोधात कोणीही एक जरी पुरावा आणून दिला, तर मी या पदावर एक क्षणही थांबणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. (MPSC Paper Leak)
मुंबई : वरळीतील एसटी ऑफिस वाहतूक सिग्नलवर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. टॅक्सीतून उतरत असतानाच BESTच्या वेट-लीज ...
या प्रकरणाबाबत माहिती देताना भीमनवार यांनी स्पष्ट केले की, एमपीएससीकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या त्याचा तपास सुरू आहे. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आयोगाकडून एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे, तर राज्य सरकारनेही उच्चाधिकार समिती स्थापन करून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वस्तुस्थिती समोर असतानाही सातत्याने वैयक्तिक स्तरावर आणि राजकीय हेतूने आपली प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न होत असल्याने आपण अत्यंत व्यथित असल्याचे त्यांनी नमूद केले. (MPSC Paper Leak)
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन विजयी उमेदवारांनी नगरसेवकपदाची सूत्रे हाती घेतली असली, तरी त्यांच्यापुढील अडचणी अद्याप ...
आपण कार्यभार स्वीकारल्यापासून आयोगाच्या कार्यपद्धतीत अनेक रचनात्मक व गुणात्मक सुधारणा केल्याची माहितीही त्यांनी दिली. आतापर्यंत स्पर्धा परीक्षेच्या ८ आणि सरळसेवा भरतीच्या ७६ चाळणी परीक्षा अशा एकूण ८४ परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. शासनाकडून पदांची मागणी आल्यापासून ते अंतिम निकाल जाहीर होईपर्यंतच्या प्रक्रियेत सुधारणा केल्यामुळे आता १८ ते २१ दिवसांत निकाल जाहीर करणे शक्य झाले आहे. भविष्यात निकाल महिनाभरात जाहीर करण्याचे नियोजन असून, विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज व्हावे आणि एमपीएससीची प्रतिष्ठा अबाधित राहावी यासाठी आपण सदैव पारदर्शी व निष्पक्ष व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे विवेक भीमनवार यांनी म्हटले आहे. (MPSC Paper Leak)