वसई : वसईतील कामण (नायगाव पूर्व) येथील एका कारखान्यात कामगाराच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी दुर्दैवी घटना घडली आहे. रोजच्याप्रमाणे काम करत असताना अचानक ट्रान्सफॉर्मरचा रेडिएटर अंगावर पडल्याने अशोक किसान वाघ (वय ५४) या ज्येष्ठ कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे औद्योगिक विश्वात कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अचानक रेडिएटर निसटला अन् अंगावर कोसळला
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अशोक वाघ हे कामण परिसरातीलच रहिवासी होते. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ते कारखान्यात आपले नियमित काम करत होते. त्याच वेळी ट्रान्सफॉर्मरचा एक मोठा रेडिएटर अचानक निसटला आणि थेट त्यांच्या अंगावर कोसळला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. अपघात घडताच तिथल्या इतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
नायगाव पोलिसांकडून कारखान्यातील सुरक्षेची चौकशी (Vasai factory accident)
अगरतळा : त्रिपुरातील वेस्ट त्रिपुरा (Tripura) जिल्ह्यातील सालबागान परिसरात एनसीसी (NCC) पोलीस आणि आसाम रायफल्स यांनी एका संयुक्त कारवाईत बिहारच्या दोन ...
या घटनेची बातमी मिळताच नायगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अंतर्गत प्रकरणाची नोंद केली आहे. कारखान्यात कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना केल्या होत्या की नाही आणि रेडिएटर कसा निसटला, या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस आता कसून तपास करत आहेत.
मुंबईतील मुलुंडमध्येही वीजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू
कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
मुलुंडच्या घटनेनंतर नवघर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक आरती मोहनराव भंडारे यांनी रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आणि निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवत नवघर पोलिसांनी ४२ वर्षीय कंत्राटदार आणि साईट सुपरवायझर मोहम्मद अझहर इवासुद्दीन अली याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.





