Monday, September 7, 2026

Devghar On Rent Marathi Movie : 'गौतमी पाटील'ची मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री! ‘देवघर ऑन रेंट’मधून अभिनयाच्या नव्या इनिंगला सुरुवात; अंगावर शहारे आणणाऱ्या टीझरची सर्वत्र चर्चा

Devghar On Rent Marathi Movie : 'गौतमी पाटील'ची मोठ्या पडद्यावर दमदार एन्ट्री! ‘देवघर ऑन रेंट’मधून अभिनयाच्या नव्या इनिंगला सुरुवात; अंगावर शहारे आणणाऱ्या टीझरची सर्वत्र चर्चा

मुंबई : पुढील काही महिन्यांत अनेक बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये ‘देवघर ऑन रेंट’ या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचाही समावेश आहे. सिनेमाच्या हटके नावामुळे घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, अनेक दिवसांनंतर मराठी प्रेक्षकांना मिस्ट्री-थ्रिलर प्रकारातील एक वेगळा सिनेमा पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित झाला आहे. (Devghar On Rent Marathi Movie)

आध्यात्म, गूढरहस्य आणि थरारक ॲक्शन यांचा अनोखा संगम असलेल्या ‘देवघर ऑन रेंट’ने आपल्या आगळ्यावेगळ्या विषयामुळे आधीच लक्ष वेधून घेतलं आहे. आता प्रदर्शित झालेल्या टीझरमुळे या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. टीझरमध्ये गूढ वातावरण, रहस्यमय घटनांचा मागोवा घेणारा पोलिस तपास, अंगावर काटा आणणाऱ्या रक्तरंजित प्रसंगांची झलक आणि देवाच्या दाराशी येऊन थांबणारं अनाकलनीय रहस्य पाहायला मिळतं. त्यामुळे नेमकं या रहस्यामागे दडलंय तरी काय, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. (Devghar On Rent Marathi Movie)

टिझरमध्ये काही पात्रांच्या चेहऱ्यांवरील तणाव आणि भावनिक संघर्षही ठळकपणे समोर येतो. त्यामुळे देव, श्रद्धा आणि मानवी कर्म याभोवती फिरणाऱ्या या कथेत नेमकं कोणतं रहस्य दडलं आहे, याची उत्सुकता निर्माण होते. 'कर्म काहीही असो, सगळ्या वाटा देवाच्या दारात जातात' या गूढ आणि अर्थपूर्ण विचाराभोवती चित्रपटाची कथा गुंफली गेल्याचे जाणवते. त्याचबरोबर 'विचार आणि अविचाराच्या उंबरठ्यावरची गोष्ट' अशी आगळीवेगळी ओळख देणारा हा सिनेमा नेमकं कोणतं रहस्य उलगडणार, हे पाहण्याजोगचं आहेच. (Devghar On Rent Marathi Movie)

सिनेमात मराठीतील तगडी स्टारकास्ट आहे. अभिनेता निखिल चव्हाण, अंकित मोहन, भाऊ कदम, शशांक शेंडे, अश्विनी चावरे, वैभव चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, अनिल नागरकर, सिद्धेश्वर झाडबुके महत्त्वाच्या भूमिकेत आहे. टीझरमध्ये दिसत नसली तरी डान्सर गौतमी पाटीलही सिनेमात आहे. त्याचबरोबर 'केजीएफ'फेम गरुडा राम आणि श्रवण राघवेंद्र हे दाक्षिणात्य कलाकारही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. 'देवघर ऑन रेंट' हा सिनेमा २५ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रासह बेळगाव, हैदराबाद, इंदूर आणि बडोदा येथे होणार आहे. (Devghar On Rent Marathi Movie)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >