Vasai factory accident : वसईमध्ये कारखान्यात मोठी दुर्घटना : ट्रान्सफॉर्मरचा रेडिएटर अंगावर पडल्याने ५४ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू!

वसई : वसईतील कामण (नायगाव पूर्व) येथील एका कारखान्यात कामगाराच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारी दुर्दैवी घटना घडली आहे. रोजच्याप्रमाणे काम करत असताना अचानक ट्रान्सफॉर्मरचा रेडिएटर अंगावर पडल्याने अशोक किसान वाघ (वय ५४) या ज्येष्ठ कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे औद्योगिक विश्वात कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



अचानक रेडिएटर निसटला अन् अंगावर कोसळला


मिळालेल्या माहितीनुसार, मृत अशोक वाघ हे कामण परिसरातीलच रहिवासी होते. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ते कारखान्यात आपले नियमित काम करत होते. त्याच वेळी ट्रान्सफॉर्मरचा एक मोठा रेडिएटर अचानक निसटला आणि थेट त्यांच्या अंगावर कोसळला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. अपघात घडताच तिथल्या इतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.



नायगाव पोलिसांकडून कारखान्यातील सुरक्षेची चौकशी (Vasai factory accident)



या घटनेची बातमी मिळताच नायगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अंतर्गत प्रकरणाची नोंद केली आहे. कारखान्यात कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना केल्या होत्या की नाही आणि रेडिएटर कसा निसटला, या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस आता कसून तपास करत आहेत.



मुंबईतील मुलुंडमध्येही वीजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू


दरम्यान, मुंबईतील मुलुंड पूर्व परिसरातही कामगाराच्या मृत्यूची अशीच एक घटना समोर आली आहे. संभाजी उद्यानाजवळ एका बांधकामाच्या ठिकाणी १३ ऑगस्ट रोजी काम करताना शाहजहान इब्रान अली (वय २६, मूळ रा. बिहार) या तरुण कामगाराचा विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास वीर सावरकर रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.



कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल


मुलुंडच्या घटनेनंतर नवघर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक आरती मोहनराव भंडारे यांनी रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आणि निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवत नवघर पोलिसांनी ४२ वर्षीय कंत्राटदार आणि साईट सुपरवायझर मोहम्मद अझहर इवासुद्दीन अली याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

Nora Fatehi Defamation Case : नोरा फतेही अडचणीत! ‘लेगो विमान’ म्हणणं पडलं महागात; थेट ३ कोटींचा मानहानीचा दावा

मुंबई : अभिनेत्री नोरा फतेही सध्या कायदेशीर वादात अडकली आहे. एका विमान वाहतूक कंपनीने तिच्याविरोधात गांधीनगर

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरांचा लोणावळ्यात ₹70 कोटींचा ‘मास्टरस्ट्रोक’! 3.86 एकर जमीन खरेदी; नेमका काय आहे प्लॅन?

पुणे : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने विक्रमांचे डोंगर उभारणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी

Courier Scam : UK गिफ्टच्या आमिषाने सुरू झाला खेळ! कुरिअर ते CBI अधिकारी… असा रचला फसवणुकीचा सापळा

नागपूर : सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी झालेली ओळख एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला तब्बल २४ लाखांहून अधिक

Egypt Air Show : इजिप्तच्या आकाशात भारताचा ‘सारंग’ थरार! ‘डॉल्फिन लीप’सह नव्या कसरतीने जगाचे लक्ष वेधणार

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या शौर्याची आणि स्वदेशी एरोस्पेस क्षमतेची झलक आता इजिप्

Maharashtra Private Coaching Centres Act 2026 : खासगी शिकवणी केंद्र नियमन कायद्याच्या मसुद्यावर नागरिकांना सूचना-हरकती नोंदविण्यास १५ सप्टेंबरपर्यंत संधी

मुंबई : महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ च्या मसुद्याला राज्यभरातून मोठ्या

College Admission : ऑफलाईन, अनधिकृत प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई; इयत्ता ११ वीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याचे शिक्षण संचालनालयाचे निर्देश

मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारेच