Silver Oak Meeting : मंत्री नितेश राणे यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवारांची ‘सिल्वर ओक’वर भेट

ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मच्छीमारांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा


मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची दिली माहिती


मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची दिली माहिती



मुंबई : मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांची आज ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज्यातील मत्स्य व्यवसाय, मच्छीमार बांधवांचे हित आणि बंदरांच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.(Silver Oak Meeting)


?feature=share

ससून डॉकच्या आधुनिकीकरणासाठी मत्स्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मंत्री नितेश राणे यांनी पवार यांना दिली. तसेच ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ची माहिती पुस्तिका भेट देऊन मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची माहितीही त्यांनी दिली.(Nitesh Rane Sharad Pawar Meeting)



महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायाला अधिक चालना देणे, मच्छीमार बांधवांच्या हितासाठी प्रभावी उपाययोजना करणे तसेच बंदरांच्या विकासाला गती देण्यासाठी शासनामार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाल्याचे नितेश राणे यांनी आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (Nitesh Rane Sharad Pawar Meeting)

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वेकडून कोकणवासीियांना मोठी भेट; CSMT-सावंतवाडी रोड नवीन दैनिक एक्सप्रेस सुरू

Mumbai : मुंबई आणि कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेद्वारे

BEST Bus Accident : वरळीत सिग्नलवर काळाचा घाला! टॅक्सीतून उतरताच BEST बसच्या.....अन् काही सेकंदांतच अनर्थ!

मुंबई : वरळीतील एसटी ऑफिस वाहतूक सिग्नलवर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

Raj Thackeray : राज ठाकरे झाले दुसऱ्यांदा आजोबा

- अमित ठाकरे यांना कन्यारत्न; ‘शिवतीर्थ’वर आनंदाचे वातावरण मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज

Mumbai coastal road car racing : मुंबईच्या कोस्टल रोडवर गाड्यांची सुसाट रेसिंग! मरीन ड्राईव्हवर ६ ते ७ कार चालकांवर गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ कोस्टल रोडच्या दक्षिण वाहिनीवर (Southbound Stretch) अतिवेगाने आणि धोकादायकपणे कार

Dadar Best Bus News: भररस्त्यात बस ड्रायव्हरच्या कानशि‍लात देणाऱ्याविरोधात तक्रार, मुंबई पोलीस काय ॲक्शन घेणार?

मुंबई: मुंबईमध्ये बस चालकाने कार चालकाला रस्ता न दिल्यामुळे मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली (Mumbai News).

Devendra Fadnavis : कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक तपासणी

प्रतिबंधात्मक उपचार व डिजिटल नोंदणीवर भर मुंबई : कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) वेळीच निदान होऊन त्यांना