Monday, September 7, 2026

Eknath Shinde : डॉक्टरांसोबत केलेलं गैरवर्तन खपवून घेणार नाही; एकनाथ शिंदेंचा कठोर निर्णय, राहुल घरत निलंबित

Eknath Shinde : डॉक्टरांसोबत केलेलं गैरवर्तन खपवून घेणार नाही; एकनाथ शिंदेंचा कठोर निर्णय, राहुल घरत निलंबित

पणजी (गोवा)/मुंबई : शिवसेना प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांसोबत होणाऱ्या गैरवर्तनाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात, त्यांनी शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांना पक्षातून निलंबित करण्याची घोषणा केली आहे. गोव्यात झालेल्या पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली. (Eknath Shinde)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पालघरमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. डॉक्टर किंवा इतर रुग्णालय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. शिवसेना अशा घटनांना कधीही पाठिंबा देणार नाही. ते म्हणाले की, जर रुग्णासोबत कोणताही निष्काळजीपणा किंवा गैरवर्तन झाले असेल, तर कायदेशीर तक्रार दाखल करायला हवी होती. कोणीही कायदा हातात घेणे योग्य नाही आणि शिवसेना त्याला पाठिंबा देणार नाही. (Eknath Shinde)

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, डॉक्टरवर हल्ला केल्याबद्दल शिवसेनेचे पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांना पक्षातून निलंबित करून काढून टाकण्यात येईल. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा दिला की, डॉक्टरांवरील हल्ला कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही आणि शिवसेना अशा कोणत्याही घटनेला पाठिंबा देणार नाही. (Eknath Shinde)

?feature=share

गोवा निवडणुकीतील शिवसेनेच्या भूमिकेबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेची महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपसोबत युती आहे. शिवसेना आणि भाजप हे समान विचारसरणीचे मित्रपक्ष आहेत. गोवा निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना आपली भूमिका ठरवेल. (Eknath Shinde)

चुकीची माहिती दिल्याबद्दल उबाठा नगरसेविका विशाखा राऊत यांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी आपले मत मांडताना सांगितले की, खोटी कागदपत्रे सादर करून किंवा महत्त्वाची माहिती लपवून निवडणूक लढवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. (Eknath Shinde)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >